टिम डेव्हिड लगावला सर्वात लांब षटकार(फोटो:सोशल मीडिया)
Tim David hits the longest six in a T20 match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला आहे. बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य गाठून ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात टिम डेव्हिडने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांची बरसात करत केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावांची स्फोटक खेळी केली. यादरम्यान, त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार मारून एक नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे.
हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये भारताचा ‘सुंदर’ विजय; ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सातव्या षटकात, टिम डेव्हिडने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एक ऐतिहासिक षटकार खेचला आहे. त्याने अक्षर पटेलच्या पूर्ण लांबीच्या चेंडूवर एक शक्तिशाली फटका मारला, जो थेट स्टेडियमच्या छताच्यावरुन गेला आणि बाहेर गेला. जेव्हा या षटकाराची लांबी मोजली गेली तेव्हा त्याची लांबी १२९ मीटर इतकी भरली. ज्यामुळे तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार ठरला आहे. हा षटकार केवळ टी२० क्रिकेटमधील सर्वात लांबच नव्हता तर भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार देखील होता. या शॉटसह डेव्हिडने त्याचाच कर्णधार मिचेल मार्शचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने यापूर्वी १२४ मीटरचा षटकार खेचला होता.
टिम डेव्हिडची खेळी केवळ विक्रम मोडणारीच नव्हती तर ऑस्ट्रेलियासाठी सामना बदलणारी देखील ठरली. तो फलंदाजीसाठी आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या स्कोअर बोर्डवर फक्त १४ धावा लागल्या होत्या. संघ अडचणीत असताना डेव्हिडने आक्रमक फलंदाजी केली आणि भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावांची स्फोटक खेळी केली. परंतु, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि परिणामी डेव्हिडची खेळी व्यर्थ गेली.
हेही वाचा : IND-A vs SA-A: भारतापुढे दक्षिण आफ्रिकाची शरणागती! कर्णधार ऋषभ पंतची विजयी फटकेबाजी






