Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen
अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 2,380 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, गेल्या 24 तासात 15 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 30,041 वरून 27,212 वर गेली आहेत. काल देशात 2,961 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
#COVID19 | India reports 2,380 new cases and 5,188 recoveries in the last 24 hours; the active caseload stands at 27,212. (Representative image) pic.twitter.com/bwk1i9xsVk — ANI (@ANI) May 7, 2023
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, आज सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 27,212, एकूण संक्रमणांपैकी 0.06 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.75 टक्के नोंदवण्यात आला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,10,738 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत COVID-19 लसींचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.
[read_also content=”मणिपूर पेटलं; हिंसाचारानं आतापर्यंत 50 हून अधिक घेतले बळी, अतिरिक्त जवान तैनात https://www.navarashtra.com/india/death-toll-crosses-52-in-manipur-violence-extra-security-personnel-appointed-nrps-395909/”]