Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा

वंध्यत्व ही जागतिक पातळीवरील आरोग्य समस्या आहे. जगभरातील जवळपास ६ ते ८ कोटी जोडप्यांना या समस्या दरवर्षी भेडसावतात आणि त्यातील जवळपास १५-२० दशलक्ष लोक भारतात आहेत. या समस्येबाबत आता जास्तीत जास्त चर्चा होऊ लागली आहे. पण ही समस्या नक्की का निर्माण होतेय?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 25, 2024 | 05:08 PM
पुरूषांमधील वंध्यत्वाची समस्या

पुरूषांमधील वंध्यत्वाची समस्या

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, विकसनशील देशांमधील चारपैकी एका जोडप्याला वंध्यत्वाचा त्रास भेडसावतो. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार भारतातील वंध्यत्वाचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे आणि त्यातील ४० टक्के पुरूषांमधील वंध्यत्व आहे.  

डॉक्टरांना भारतात मागील दशकभरामध्ये पुरूषांमधील वंध्यत्व मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन (आयएसएआर)नुसार, भारतातील सुमारे १०-१४ टक्के जोडपी वंध्यत्वाने ग्रस्त आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वंध्यत्व फक्त महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही वाढू लागले आहे. मात्र याचा ताण आणि भार कायम फक्त महिलांवर असतो. त्यामुळे वंध्यत्वाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पुरूषांमध्ये हे सायलेंट आहे. त्यांना योग्य ती काळजी आणि उपचार मिळत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये वंध्यत्वामुळे जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळण्यापासून वंचित राहण्याची गरज नसते तरीही हे होते.  (फोटो सौजन्य – iStock) 

वंध्यत्वाची कारणे 

काय आहेत वंधत्वाची कारणे

वंध्यत्वाची कारणे अनेक आहेत. ती पुरूष आणि महिला पुनरूत्पादन यंत्रणांना बाधित करतात. यात असलेले घटक म्हणजे ब्लॉकेजमुळे पुनरूत्पादन मार्गांमधील अडथळे (इजॅक्युलेटरी डक्ट्स आणि सेमिनल व्हेसिकल्स). त्यामुळे वीर्य बाहेर पडण्यात अडचणी येतात, पिट्युटरी ग्रंथी हायपोथेलेमस आणि टेस्टिकल्सनी निर्माण केलेल्या हार्मोन्समध्ये हार्मोन्सचे असंतुलन किंवा टेस्टिकल्सना स्पर्म निर्मिती पेशींवर परिणाम करणाऱ्या परिस्थितीमुळे स्पर्म निर्मिती करण्यात येणारे अपयश, तसेच स्पर्मचा अनियमित आकार किंवा दर्जा ज्यामुळे त्याच्या रचनेवर आणि हालचालींना बाधा येते. त्यामुळे स्त्रियांमधील बीजाला पुनरूत्पादनासाठी तयार करणे शक्य होत नाही. 

हेदेखील वाचा – केवळ महिलाच नाही तर पुरुषही वेगाने होत आहेत वंध्यत्वाचे शिकार , कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

स्पर्मचा दर्जा

तसेच जोडपी आपले शिक्षण आणि करियर यांना प्राधान्य देत असल्यामुळे लग्नाचे वय वाढू लागले आहे. अनेक पुरूष आणि स्त्रिया आता आपल्या तिशीच्या मधल्या किंवा शेवटच्या टप्प्यात लग्न करतात. त्यामुळे पालकत्वाला विलंब होतो. पुरूषांचे वय वाढते तसे त्यांच्या स्पर्मचा दर्जाही कमी होतो. त्यामुळे जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण जाते. याशिवाय पुरूषांच्या रोजच्या आयुष्यात सामान्य समस्या भेडसावतात. त्यामुळे वंध्यत्वात भर पडते. ताणतणाव, लठ्ठपणा, वृषणाला गंभीर दुखापत किंवा दीर्घकाळ वृषण खूप जास्त गरम होणे अशा विविध समस्या आहेत. वंध्यत्वाच्या समस्या मद्यपान किंवा तंबाखूसारख्या व्यसनांमुळेही वाढू शकतात.  

खुलेपणाने कमी चर्चा

वंध्यत्वाबाबत चर्चा होणे गरजेचे

डॉ. केदार गानला, इन्‍फर्टिलिटी स्पेशालिस्‍ट, अंकूर फर्टिलिटी, मुंबई, “पुरूषांमधील वंध्यत्वाबाबत अनेक समाजांमध्ये बहिष्कृतीकरणाच्या भीतीमुळे खुलेपणाने चर्चा केली जात नाही. त्यामुळे अनेक पुरूषांना वैद्यकीय उपचार स्वतःसाठी घेऊन आपल्या जोडीदाराला गर्भवती करण्याबाबत काहीच माहीत नसते. वैद्यकीय विज्ञानाने मागील दोन दशकांमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्यामुळे पुरूषांमधील वंध्यत्वावरील उपचारांचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत आणि त्यातून इंट्रासायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) सारख्या प्रभावी औषधे आणि अद्ययावत असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह तंत्रज्ञान (एआरटी) सहजपणे उपलब्ध होतात. 

हेदेखील वाचा – लग्नानंतरही मूल होत नाही का? 100 पैकी 10 जण ‘या’ आजाराने ग्रस्त, ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

कशी होते मदत 

आयसीएसआयमध्ये स्पर्मची हालचाल, संख्या आणि दर्जा यांच्याबाबत समस्या असल्यास स्पर्मची पेशी बीजात थेट इंजेक्ट केली जाते. आयसीएसआय ही इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्राचा प्रकार आहे. त्यातून गर्भधारणेच्या नैसर्गिक पद्धतींमध्ये अडथळे येणाऱ्या जोडप्यांना मदत केली जाते. जोडप्यांचे लग्न तिशीच्या शेवटी झाले असल्यास त्यांना कुटुंब नियोजनासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन फायदा मिळतो. योग्य त्या मार्गदर्शनामुळे त्यांना आपले पुनरूत्पादन आरोग्य सुधारण्यासाठी योग्य ते पर्याय निवडण्यास मदत होते.”

जागरूकता महत्त्वाची

हा स्टिग्मा प्रामुख्याने लहान शहरे आणि गावांमध्ये आहे. इथे कुटुंबं अत्यंत घट्ट बांधलेल्या समाजात राहतात आणि त्यामुळे पुरूष तसेच त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या वंध्यत्वाची समस्या माहीत झाल्यास समाजाकडून केल्या जाणाऱ्या बहिष्काराची किंवा सामाजिक स्थान खालावण्याची शक्यता यांची भीती वाटते. लहान शहरांमध्ये त्या भोवती असलेला कलंक कमी करण्यासाठी शैक्षणिक जागृती कार्यक्रम आयोजित करण्याची गरज वाढू लागली आहे. तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सेस असलेले स्पेशलाइज्ड फर्टिलिटी क्लिनिक्स ही काळाची गरज आहे, कारण त्यातून तज्ज्ञ व सेवेपासून वंचित लोक जवळ येऊ शकतील. वंध्यत्वाचा तज्ज्ञ म्हणून डॉक्टरांचे कर्तव्य जोडप्यांना त्यांच्या पालकत्वाच्या मार्गावर मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांच्या अडथळ्यावर सर्वोत्तम उपाययोजना शोधून देण्याचे आहे.

Web Title: Infertility in men who raised a concern about the issue says experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

ना प्रेग्नंन्सी, ना स्तनपान, तरीही होतंय Nipple Discharge, गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर
1

ना प्रेग्नंन्सी, ना स्तनपान, तरीही होतंय Nipple Discharge, गंभीर आजाराचे लक्षण; दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर

Constipation Home Remedies: आतड्याला चिकटलेले घट्ट शौच एका झटक्यात होईल साफ, Nityanandam Shree चा सोपा उपाय
2

Constipation Home Remedies: आतड्याला चिकटलेले घट्ट शौच एका झटक्यात होईल साफ, Nityanandam Shree चा सोपा उपाय

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!
3

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!

High Blood Pressure वरील रामबाण उपाय आहे Japanese Trick, रोज केल्याने रक्तदाब नेहमी राहील नियंत्रणात
4

High Blood Pressure वरील रामबाण उपाय आहे Japanese Trick, रोज केल्याने रक्तदाब नेहमी राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.