स्त्री पुरुषांमध्ये वाढतोय जननेंद्रियाचा टीबी
भारतामध्ये वंध्यत्वाची समस्या वाढत चालली आहे. ही गंभीर समस्या असून स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये वाढत चालली आहे. अनेक लोक वयाच्या 30 किंवा 35 वर्षी पालक बनण्याची इच्छा व्यक्त करतात. पण भारतात वंध्यत्वाचा आजार वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 100 पैकी 10 लोकांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. एम्सच्या स्त्रीरोग विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात IVF द्वारे पालक बनण्यासाठी आलेल्या 100 पैकी सुमारे 10 जणांना जननेंद्रियाच्या क्षयरोगाचे निदान झाल्याचे दिसून आले आहे. ही समस्या स्त्री आणि पुरुषांमध्ये दिसून आल्याने ही एक मोठी समस्या आहे.(फोटो सौजन्य-istock)
जननेंद्रियाचा टीबी म्हणजे टीबीचा संसर्ग फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयात पसरू लागतो. हा आजार गर्भाशयात पसरू लागल्यानंतर स्त्रियांच्या जननेंद्रियांवर, अंडाशयांवर आणि गर्भाशयाच्या मुखावर परिणाम करू लागतो, याला पेल्विक टीबी असे देखील म्हणतात. पुरुषांमधील जननेंद्रियाचा टीबी शुक्राणूंना वीर्य पोहचण्यासाठी अडथळा निर्माण करतात, त्यामुळे स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम दिसून येतो.
हे देखील वाचा: ना जिम, ना डाएट ‘या’ गोष्टी फॉलो करून R Madhavan ने कमी केले वजन! जाणून घ्या
हे देखील वाचा: World IVF Day: आयव्हीएफ उपचारांबद्दलच्या गैरसमजुती, पद्धतीबाबत घ्या जाणून
जननेंद्रियाच्या टीबीमुळे गर्भधारणेत अनेक अडथळे निर्माण होतात. स्त्री किंवा पुरुषांमध्ये जननेंद्रियाचा टीबी आढळून येतो. अशावेळी वंध्यत्व, तीव्र ओटीपोटात वेदना, अनियमित मासिक पाळी इत्यादी समस्या जाणवू लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने टीबी चाचणी करून घेणे आवश्यक आहे. यशोदा हॉस्पिटल कौशांबीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. छावी गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, टीबी झाल्यानंतर वेळेवर चाचणी करून योग्य ते औषध उपचार घेणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. गर्भाधारणेचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचं टीबी नसतो पण आरोग्यासंबंधित समस्या जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार बरे होऊ शकतात. जननेंद्रियाच्या टीबीची लक्षणे दिसू लागल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.