नवी दिल्ली: आज राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे एक लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. यामध्ये पायलट देखील शहिद झाल्याचे समजते आहे. दरम्यान यंदाचे २०२५ वर्ष हे भारतीय वायुसेनेसाठी इतके चांगले नसल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी पासून आजच्या तारखेपर्यंत भारतीय वायुसेनेने तब्बल ५ लढाऊ विमाने गमावली आहेत. क्रॅश झालेल्या विमानांमध्ये ३ जग्वार, एक मिराज २००० आणि एएन-३२ या लढू विमानांचा समावेश आहे. आज झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. तर या ५ दुर्घटना कधी कधी घडल्या आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
१. फेब्रुवारी महिन्यात मिराज २००० या लढाऊ विमानाने ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. हे उड्डाण प्रशिक्षणासाठी होते. मात्र हे विमान मध्यप्रदेशच्या शिवपुरी इथे क्रॅश झाले. मात्र सुदैवाने या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले होते.
२. मार्च महिन्याच्या ७ तारखेला अंबाला एअरबेसवरून जग्वार या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. मात्र काही काळाने हे विमान पंचकुलामध्ये क्रॅश झाले होते. तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमानाला अपघात झाला होता. या घटनेत पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले होते.
३. भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ या लढाऊ विमानाने पश्चिम बंगालमधून लँडिंग करत असतानाच क्रॅश झाले होते. मात्र हे क्रॅश कशामुळे झाले होते हे समजू शकले नाही.
४. एप्रिल महिन्यात रात्रीच्या वेळेस प्रशिक्षणसाठी जग्वार या लढाऊ विमान गुजरातच्या जामनगरमध्ये क्रॅश झाले होते.
५. आज राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील भानुदा भावात भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. या घटनेत पायलट शहीद झाल्याचे समजते आहे.
भारतीय वायुसेनेची ताकद किती?
भारतीय वायुसेनेकडे एकूण ५१३ फायटर जेट्स आहेत. भारताची वायुसेना जगातील चौथी ताकदवान वायुसेना आहे. विविध लढाऊ विमानांची मिळून भारताकडे ३१ स्क्वाड्रन आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये १२ ते २४ लढाऊ विमाने असतात.
Rajasthan Plane Crash Video: इंडियन एअरफोर्सचे Jaguar क्रॅश; पायलट शहीद
इंडियन एअरफोर्सचे Jaguar क्रॅश
भारतीय वायुसेनेचे विमान क्रॅश झाल्यावर त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला. या विमानाचे पायलट शहीद झाल्याचे समजते आहे. मात्र भारतीय वायुदलाने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. घटना घडताच स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होत होते.
विमान क्रॅश,पायलट शहीद
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारतीय वायू दलाचे एक लढवून विमान राजस्थानच्या भानुदा गावात अपघातग्रस्त झाले आहे. यामध्ये पायलट शहीद झाल्याचे संगितले जात आहे. मात्र अजून वायुसेनेने अधिकृत माहिती दिली नाही. दुर्घटना झाल्यावर विमानाचे अवशेष दूरवर पसरले आहेत. दरम्यान बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.