Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bolivia Plane Crash: आकाशातून पडला नोटांचा पाऊस; बोलिव्हियात लष्करी विमान कोसळले अन् महामार्गावर कोट्यवधी रुपये, पाहा VIDEO

बोलिव्हियाची राजधानी बोलिव्हियामध्ये एका विमान अपघातात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मालवाहू विमानात नोटा होत्या, ज्या अपघातानंतर परिसरात पसरल्या होत्या, त्यामुळे गोंधळ उडाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 28, 2026 | 10:41 AM
bolivia military plane crash el alto money scattered on highway 15 dead

bolivia military plane crash el alto money scattered on highway 15 dead

Follow Us
Close
Follow Us:
  • भीषण दुर्घटना
  • नोटांचा पाऊस
  • पैसे लुटण्यासाठी गर्दी

Bolivia Plane Crash 2026 Latest News : निसर्गाचा खेळ कधी काय दाखवेल याचा नेम नाही, पण बोलिव्हियामध्ये शुक्रवारी रात्री जे घडले ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळ असलेल्या एल अल्टो (El Alto) शहरात हवाई दलाचे एक मालवाहू विमान महामार्गावर कोसळले. या भीषण अपघातात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या अपघाताची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे, विमानातून मृतदेहांसोबतच चक्क नवीन कोऱ्या नोटांचे गठ्ठे बाहेर पडले आणि संपूर्ण महामार्गावर पैशांचा जणू पाऊस पडला.

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, बोलिव्हियन एअर फोर्सचे ‘हरक्यूलिस’ (Hercules) हे अवाढव्य विमान सेंट्रल बँकेतून नवीन चलनी नोटा घेऊन दुसऱ्या शहराकडे उड्डाण करत होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते थेट विमानतळाजवळील व्यस्त महामार्गावर आदळले. विमान आदळताच मोठा स्फोट झाला आणि महामार्गावर उभ्या असलेल्या १५ हून अधिक वाहनांना विमानाने जोरदार धडक दिली. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की, अनेक गाड्यांचा कोळसा झाला. अग्निशमन दलाचे प्रमुख पावेल तोवर यांनी १५ मृत्यूंची पुष्टी केली आहे, मात्र मृतांमध्ये विमानातील कर्मचारी किती आणि महामार्गावरील लोक किती, याचा तपास अद्याप सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

नोटांचा पाऊस अन् मानवी संवेदनांचा अंत

अपघात झाल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्यातून नोटांची पाकिटे हवेत उडाली. काही क्षणातच एल अल्टोचा महामार्ग गुलाबी आणि निळ्या रंगाच्या चलनी नोटांनी भरून गेला. अपघाताचा थरार पाहून लोक मदतीसाठी धावतील असे वाटले होते, पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंनी सर्वांनाच चकित केले. अनेक लोक जळत्या विमानातील जखमींना वाचवण्याऐवजी जमिनीवर विखुरलेल्या नोटा गोळा करण्यासाठी धावत सुटले. लोकांनी आपापल्या खिशात आणि पिशव्यांमध्ये पैसे भरण्यास सुरुवात केली.

🚨🇧🇴 Tragedy in Bolivia A Bolivian Air Force C 130H Hercules has crashed near El Alto International Airport in La Paz, leaving at least 15 people dead and more than 30 injured. The aircraft had departed from Santa Cruz carrying newly printed banknotes from the central bank.… pic.twitter.com/WfndFTAfDi — WAR (@warsurv) February 28, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War: पाकिस्तानी सैन्य कामचुकार! तालिबानकडून हारून गेले ‘या’ मुस्लिम राष्ट्रांच्या पाया पडायला; केली युद्धबंदीची विनंती

पोलिसांचा लाठीमार आणि दंगल नियंत्रण

विखुरलेले पैसे लुटण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक पोलिसांनी तातडीने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. पैसे लुटणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. “एकीकडे लोक मरत होते आणि दुसरीकडे काही लोक पैशांच्या मागे धावत होते, हे दृश्य अत्यंत विदारक होते,” असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा विमान अपघात कोठे आणि कधी झाला?

    Ans: हा अपघात बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील 'एल अल्टो' शहरात शुक्रवारी रात्री उशिरा झाला.

  • Que: विमानात नेमके काय होते आणि किती मृत्यू झाले?

    Ans: हे बोलिव्हियन हवाई दलाचे हरक्यूलिस विमान होते, जे सेंट्रल बँकेच्या नवीन नोटा घेऊन जात होते. या अपघातात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: अपघातानंतर महामार्गावर गर्दी का झाली?

    Ans: विमानातील चलनी नोटांचे गठ्ठे महामार्गावर विखुरल्यामुळे, ते पैसे लुटण्यासाठी स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Bolivia military plane crash el alto money scattered on highway 15 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Accident
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू
1

दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू

Tiffany Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे राजस्थान कनेक्शन? ताजमहाल पाहून टिफनी ट्रम्प थेट जैसलमेरला रवाना; कारण आले समोर
2

Tiffany Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे राजस्थान कनेक्शन? ताजमहाल पाहून टिफनी ट्रम्प थेट जैसलमेरला रवाना; कारण आले समोर

India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार
3

India-Myanmar Ties: म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती
4

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.