Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : विक्री प्रमाणपत्रसाठी भाडेवाढ, फेरीवाल्यांचं होतंय आर्थिक शोषण; संतप्त संघटनेचं महापौरांना साकडं

शहरातील ८४२ छोटे व्यापारी, फेरीवाले यांचे सर्वेक्षण झाले असून १० फेरीवाल्यांना काही दिवसापूर्वी विक्री प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या विक्री प्रमाणपत्रासाठी ८६० रुपये भरून घेण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2026 | 01:24 PM
Kolhapur News : विक्री प्रमाणपत्रसाठी भाडेवाढ, फेरीवाल्यांचं होतंय आर्थिक शोषण; संतप्त संघटनेचं महापौरांना साकडं
Follow Us
Follow Us:
  • विक्री प्रमाणपत्रसाठी भाडेवाढ,
  • फेरीवाल्यांचं होतंय आर्थिक शोषण;
कोल्हापूर :  (वा.) शहरातील छोटे व्यापारी, फेरीवाले यांना एफएसएआय व इचलकरंजी महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरिक उपजीविक अभियान (एनयुएलएम) विभागकडून ३ हजार रुपयांचे किट व प्रमाणपत्र न दिल्यामुळे व विक्री प्रमाणपत्रसाठी भाडेवाढ करून फिरता परवाना देत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटनेच्यावतीने महापौर उदय धातूंडे यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात माहिती घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरिक उपजीविक अभियान विभागाच्यावतीने शहरातील छोटे व्यापारी, फेरीवाले यांच्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण एफएसएआय यांच्या नियमावली व प्रसारासाठी व्याख्यान व मेळावा घेतला.

स्थिर विक्री प्रमाणपत्र देण्याची मागणी
यावेळी फक्त ३०० रुपये भरून घेण्यात आले होते व विक्री प्रमाणपत्राचे वाटप केले होते. परंतु या ४ वर्षांमध्ये सदर रक्कमेत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. ज्या फेरीवाले यांना सदर विक्री प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनाच फिरता विक्री परवाना असा दिला आहे. मुळात शासन निर्णयानुसार फिरता स्थिर व अन्य असे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण स्थिर झाले आहे, त्यांना स्थिर विक्री प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी शिष्ठमंडळाने केली.

Kolhapur News : गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव; कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आक्रमक

परवाना फी ची अन्यायकारक वसुली
शहरातील ८४२ छोटे व्यापारी, फेरीवाले यांचे सर्वेक्षण झाले असून १० फेरीवाल्यांना काही दिवसापूर्वी विक्री प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या विक्री प्रमाणपत्रासाठी ८६० रुपये भरून घेण्यात आले. ते पूर्णपणे अन्यायकारक असून त्यामध्ये परवाना फी ६५० रुपये व विक्री प्रमाणपत्रासाठी २१० रुपये असे घेण्यात येत आहे. मुळामध्ये जे छोटे व्यापारी, फेरीवाले वार्षिक भुईभाडे भरतात. त्यांना परवाना फी ६५० रुपये लागू आहे. यापूर्वी सन २०१७ साली इचलकरंजी नगरपरिषदेकडून विक्री प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते.

प्रमाणपत्र व कीट देण्यास टाळाटाळ
मेळाव्याला येण्यापूर्वी एनयुएलएम विभागाकडून शहरातील दोन हजार फेरीवाल्यांना मेळाव्याला उपस्थित राहिल्यास प्रमाणपत्र व ३ हजार रुपयांचे किट देणार असल्याचे सागण्यात आले होते. मेळावा संपल्यावर प्रमाणपत्र व किट वाटपबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अजून कीट व प्रमाणपत्र दिल्ली येथे ट्रान्सपोर्टमध्ये अडकले असून आठवड्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र पाच महिने झाले तरी साहित्य मिळालेले नाही.

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना

 

Web Title: Kolhapur news rent hike for sale certificate hawkers are being exploited financially angry organization slams mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • kolhapur news
  • latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
2

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
3

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
4

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.