जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित अन् विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आले असून भाजप महायुतीत सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्री त्यांचे आहेत. तर महत्वाच्या जिल्ह्यांध्ये भाजपने आपले पालकमंत्री नियुक्त केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली होती. पण त्यानंतर नाशिक आणि रायगडमध्ये मोठी नाराजी उघड झाली आता साताऱ्यात देखील कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत असून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे. मंत्रीमंडळाच्या शपथविधी आधी अशाच पद्धतीने एका पोलिस कर्माचाऱ्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदासाठी आंदोलन केले होते. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिकेने दंड थोपाटले आहेत.
दुसऱ्यांदा आमदार झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्री बनवले. त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी दिली. पण पालकमंत्रीपदावर नियुक्ती केलेली नाही. यावरून आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात दोन नंबरचे मताधिक्य मिळाले आहे. तर ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा पालकमंत्री असा नियम महायुतीत आहे. मात्र या नियमाला साताऱ्यात हरताळ फासल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे.
इतर जिल्ह्यात ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाच्या मंत्र्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र नाशिक आणि रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या पक्षांच्या मंत्र्यांना पालकमंत्री बनवले. त्यामुळेच तेथे आता वाद आणि नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. साताऱ्यातही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना डावलून शंभूराज देसाई पालकमंत्री यांना पालकमंत्री केल्याने नाराजी समोर येत आहे.
याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी, शिवेंद्रसिंहराजे हे सर्वसमावेश नेतृत्व आहेत. मुख्यमंत्र्यानी गादीचा मान राखून सध्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, अशी मागनी केली आहे.
सरकारला इशारा देताना, भाजपने 26 जानेवारीला ध्वजवंदनाचा मान पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच द्यावा, अशी विनंती केली आहे. जर ही विनंती मान्य न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही कांचन साळुंखे यांनी दिला आहे. त्यांनी रायगड व नाशिक जिल्ह्यात नाराजीनाट्यानंतर पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याचे सांगितले. तेथे दबाव वाढल्यानेच हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, साताऱ्यात जनसामान्यांच्या मनात मुळातच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव असतानाही दुसऱ्याचे नाव जाहीर कसे जाहीर झाले असाही सवाल आता उपस्थित केला जातोयय
नाशिक, रायगड आणि कोल्हापूर पाठोपाठ आता साताऱ्यातही नाराजीचा सूर उमटल असून पालकमंत्री म्हणून अनेकांनी काम पाहिले मात्र अशाप्रकारे दबावाचे राजकारण झाले नसल्याचाही दावा साताऱ्यात केला जातोय. तर सध्याचा निर्णय बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही कांचन साळुंखे यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विचार न केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमचा मार्ग आम्हाला निवडावा लागेल असेही सूचक वक्तव्यही करण्यात येत आहे.
सातारकरांच्या मनात शिवेंद्रसिंहराजे भोसले असून तेच पालकमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा होती. पण वरिष्ठांनी साताऱ्यावर अन्याय केला. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाईंची नियुक्त करण्यात आली. पण त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात कुठेही उत्साह दिसून आलेला नाही. यावरूनच साताऱ्याची जनता नाराज असल्याचे दिसून येते. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी केली आहे.