Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा उद्योग समूहाने शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले : मानसिंगराव नाईक

कृष्णा उद्योग समूहाने आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून कराडसह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याचे कार्य केले आहे, असे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Sangli District Bank) अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांनी सांगितले. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2022 | 04:52 PM
कृष्णा उद्योग समूहाने शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले : मानसिंगराव नाईक
Follow Us
Close
Follow Us:

कराड : कृष्णा उद्योग समूहाने आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून कराडसह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याचे कार्य केले आहे, असे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Sangli District Bank) अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांनी सांगितले.

तांबवे (ता.वाळवा) येथे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या १९ व्या आणि सांगली जिल्ह्यातील पहिल्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार नाईक यांच्या हस्ते आणि सांगली जि.प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील व पतसंस्थेचे संस्थापक तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले.

याप्रसंगी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, दीपक पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला सहकार्य

स्व. आप्पासाहेबांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी नेहमीच सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला सहकार्य केले आहे. कृष्णा हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेचा लाभही या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. पतसंस्थेच्या नूतन शाखेमुळे या भागातील लोकांची आर्थिक गरज पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल, असा मला विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला.

गेल्या २० वर्षांत आमच्या पतसंस्थेने सभासदाभिमुख कारभार केला आहे. आजअखेर संस्थेने ३५० कोटींचा व्यवसाय केला असून, येत्या २ महिन्यात ४०० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच येत्या काळात संस्थेचा विस्तार करून, लोकांना त्यांच्या विविध गरजांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

– डॉ. अतुल भोसले, अध्यक्ष, कृष्णा बँक.

Web Title: Krishna industries group raises farmers standard of living says mansingrao naik nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2022 | 04:52 PM

Topics:  

  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

सांगलीच्या आजी-माजी खासदार, आमदारांना वसुली नोटीस; जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?
1

सांगलीच्या आजी-माजी खासदार, आमदारांना वसुली नोटीस; जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.