Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !

तासगाव सोसायटी गटातील लढतीत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. संजयकाका पाटील यांना ४०, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 03, 2026 | 12:31 PM
सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !

सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !

Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांचा निकाल जाहीर.
  • गोपीचंद पडळकर, अजितराव घोरपडे आणि संजयकाका पाटील यांची बाजी.
  • तासगावमध्ये सुमन पाटील यांचा पराभव.
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. तासगावमध्ये सुमन पाटील यांचा पराभव करत संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. त्यामुळे आमदार रोहित पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे.

मिरज सोसायटी गटातून अण्णासाहेब कोरे विजयी झाले. अनुसूचित जाती गटातून काँग्रेसचे कृष्णा कांबळे, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून राष्ट्रवादीचे संभाजी कचरे यांनी विजय मिळवला. मंगळवारी मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

दरम्यान, बँक निवडणूक जरी निवडणूकपूर्व बिनविरोध झाली असली तरी ६ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीला अपयश आले आहे, काँग्रेस पक्ष मोठा ठरला आहे. निवडणुकीत बिनविरोध ४ व निवडणुकीत २ जागा निवडून आणत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर भाजपच्या ४ बिनविरोध तर गोपीचंद पडळकर यांचा विजय असा ५ जागा भाजपा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ३ बिनविरोध आणि एक विजयी अशा चार जागा मिळाल्या आहेत, तर अजित पवार पक्षाला तीन जागा बिनविरोध मिळाल्या आहेत, त्यामुळं आता सत्ता कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी रविवारी झाले मतदान

जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ९३.९१ टक्के मतदान झाल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी सकाळी मिरज येथील शेतकरी भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. यासाठी आठ टेबल लावण्यात आले होते. एकूण २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला मतपत्रिकांचे २५-२५ चे गठ्ठे करण्यात आले. सर्व मतपत्रिकांचा हिशेब पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. चार टेबलवर सोसायटी गटातील चार तालुक्यांची, दोन टेबलवर अनुसूचित जाती गटाची, तर उर्वरित दोन टेबलवर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटाची मतमोजणी करण्यात आली.

जतच्या लढतीत पडळकरांचा विजय

जत सोसायटी गटातील लक्षवेधी लढतीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ५४ मते मिळवत विनोद पवार यांचा पराभव केला. पवार यांना ३४ मते मिळाली. पडळकर यांनी २० मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

कवठेमहांकाळमध्ये घोरपडेंची बाजी

कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी तानाजी पाटील यांच्यावर मात केली. घोरपडे यांना ३७, तर पाटील यांना ३३ मते मिळाली. अवघ्या चार मतांनी घोरपडे विजयी झाले.

तासगावमध्ये संजयकाकांचा रोहित पाटलांना धक्का

तासगाव सोसायटी गटातील लढतीत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. संजयकाका पाटील यांना ४०, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. या निकालामुळे आमदार रोहित पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील ही लढत विशेष चर्चेची ठरली.

मिरजेत कोरे यांचा विजय

मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब कोरे यांनी अनिल शेगुणशे यांच्यावर मात केली. कोरे यांना ४७, तर शेगुणशे यांना १९ मते मिळाली. २८ मतांच्या फरकाने कोरे विजयी झाले.

अनुसूचित जाती गटात काँग्रेसचे कांबळे

अनुसूचित जाती गटातील मतमोजणीत कृष्णा धोंडी कांबळे यांनी १ हजार ९१४ मते मिळवून विजय मिळवला. विलास पांडुरंग बेले यांना १७६, तर बाबासाहेब मधाळे यांना ११२ मते मिळाली. कांबळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला.

विमुक्त जाती गटात संभाजी कचरे विजयी

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय गटात संभाजी बाबुराव कचरे यांनी १ हजार ९७४ मते मिळवून विजय मिळवला. अमित शंकर पारेकर यांना १८९, तर शंकर माने यांना ४६ मते मिळाली.

बाजार समिती आवारात जल्लोष

मतमोजणी सुरू असताना बाजार समितीच्या आवारात उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. निकालाचे कल स्पष्ट होताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी मिशन हॉस्पिटल चौकात जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळण्याची व्यवस्था केली होती. विजयी उमेदवारांना हार घालण्यासाठी क्रेनही लावण्यात आली होती.

निकाल एका नजरेत…

जत — गोपीचंद पडळकर — ५४
कवठेमहांकाळ — अजितराव घोरपडे — ३७
तासगाव — संजयकाका पाटील — ४०
मिरज — अण्णासाहेब कोरे — ४७
अनुसूचित जाती — कृष्णा कांबळे — १९१४
विमुक्त जाती — संभाजी कचरे — १९७४

Web Title: Setback for rohit patil in the sangli district bank nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला’; गोपीचंद पडळकरांचा दावा
1

‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला’; गोपीचंद पडळकरांचा दावा

Gopichand Padalkar: “मतदानात अडथळा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न” सांगलीत गोपीचंद पडळकर आक्रमक!
2

Gopichand Padalkar: “मतदानात अडथळा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न” सांगलीत गोपीचंद पडळकर आक्रमक!

Sangli News: जिल्हा बँकेसाठी ९३.९१ टक्के मतदान सहा जागांचा फैसला मतपेटीत, जत-तासगाव-कवठेमहांकाळच्या निकालाकडे लक्ष
3

Sangli News: जिल्हा बँकेसाठी ९३.९१ टक्के मतदान सहा जागांचा फैसला मतपेटीत, जत-तासगाव-कवठेमहांकाळच्या निकालाकडे लक्ष

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा
4

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.