Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला’; गोपीचंद पडळकरांचा दावा

जत गटातील मतदारांचे अभिनंदन करताना पडळकर म्हणाले, जत तालुका नवनवीन इतिहास घडवण्यात माहिर आहे. पुढील पिढीचे नेतृत्व करणारे नेते सातत्याने वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करत होते. मात्र, जतच्या जनतेने त्यांचे नॅरेटिव्ह मोडून काढले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 03, 2026 | 01:38 PM
‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला’; जिल्हा बँकेवरील जयंत पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणल्याचा पडळकरांचा दावा

‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला’; जिल्हा बँकेवरील जयंत पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणल्याचा पडळकरांचा दावा

Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पडळकरांचा जत गटातून विजय
  • विजयाने जिल्हा बँकेचे राजकीय गणित बदलल्याचा दावा
  • जयंत पाटलांचे बँकेवरील वर्चस्व संपुष्टात आणल्याचे पडळकरांचे वक्तव्य
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत गटातून विजय मिळवल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. ‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला,’ अशा आक्रमक शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ‘माझ्या निकालाने जिल्हा बँकेचे संपूर्ण गणित बदलले असून, बँकेवरील जयंत पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे,’ असा दावा करत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात नव्या संघर्षाचे संकेत दिले. जिल्ह्यात ‘मी म्हणेल तेच होईल’ ही मक्तेदारी आता चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जत गटातील मतदारांचे अभिनंदन करताना पडळकर म्हणाले, जत तालुका नवनवीन इतिहास घडवण्यात माहिर आहे. पुढील पिढीचे नेतृत्व करणारे नेते सातत्याने वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करत होते. मात्र, जतच्या जनतेने त्यांचे नॅरेटिव्ह मोडून काढले आहे. ‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच कार्यक्रम झाला आहे. आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम केला. जतच्या जनतेनेही त्यांचा कार्यक्रम केला,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

जिल्हा बँकेवर एकहाती वर्चस्व ठेवण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांच्या संस्था मोडीत काढून त्या कवडीमोल दराने विकत घेण्याचा उद्योग सुरू असल्याचे सांगत त्यांनी या प्रवृत्तीला आव्हान दिले. ‘जिल्ह्यात मी म्हणेल तेच होईल, अशी मक्तेदारी आता चालू देणार नाही,’ असे स्पष्ट करत जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचीही एकाधिकारशाही खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

घोरपडेंना पाडण्यासाठी कटकारस्थाने; पैशांचा वापर झाल्याचा आरोप

आम्ही ताकदीने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहोत, असे सांगत पडळकर यांनी कवठेमहांकाळमधील निवडणुकीचाही उल्लेख केला. घोरपडे यांना पराभूत करण्यासाठी अनेक कटकारस्थाने रचण्यात आली. मात्र, ते सर्वांना पुरून उरले आहेत, असे ते म्हणाले. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर झाला असून, मतदारांना विविध आमिषे दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘आम्ही निवडणुकीच्या मैदानात उशिरा उतरलो असलो, तरी थेट बँकेत पोहोचलो आहोत,’ असे सांगत त्यांनी आपल्या विजयाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.

बँकेच्या सत्तेबाबत वरिष्ठांचा निर्णय मान्य !

जिल्हा बँकेच्या सत्तेत सहभागी होण्याच्या प्रश्नावर पडळकर यांनी सावध भूमिका घेतली. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. चांगल्या कामाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, तर चुकीच्या कामाला विरोध करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बँकेतील नोकरभरतीच्या मुद्द्यावरही त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. शिपाई भरतीची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. आता लिपिक पदाच्या परीक्षेतही आम्ही लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तेची समीकरणे, नोकरभरती आणि बँकेच्या कारभारावरूनही राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

FAQ

1. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर कुठून विजयी झाले?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर जत गटातून विजयी झाले.

2. विजयाबाबत पडळकरांनी काय दावा केला?
आपल्या विजयामुळे जिल्हा बँकेचे संपूर्ण राजकीय गणित बदलले असून, बँकेवरील जयंत पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आणल्याचा दावा त्यांनी केला.

3. पडळकरांनी विरोधकांवर कोणत्या शब्दांत टीका केली?
‘करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचाच आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केला,’ अशा आक्रमक शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

Web Title: Gopichand padalkar on ending jayant patil dominance over sangli district bank nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • jayant patil
  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !
1

सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !

Gopichand Padalkar: “मतदानात अडथळा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न” सांगलीत गोपीचंद पडळकर आक्रमक!
2

Gopichand Padalkar: “मतदानात अडथळा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न” सांगलीत गोपीचंद पडळकर आक्रमक!

Sangli News: जिल्हा बँकेसाठी ९३.९१ टक्के मतदान सहा जागांचा फैसला मतपेटीत, जत-तासगाव-कवठेमहांकाळच्या निकालाकडे लक्ष
3

Sangli News: जिल्हा बँकेसाठी ९३.९१ टक्के मतदान सहा जागांचा फैसला मतपेटीत, जत-तासगाव-कवठेमहांकाळच्या निकालाकडे लक्ष

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा
4

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.