महाड : महाडमध्ये (Mahad)महापूर (Flood In Mahad)आला आहे. आज सकाळी बचावकार्यही(Rescue Operation) सुरु आहे. दरम्यान महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.
[read_also content=”महाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video https://www.navarashtra.com/videos/rescue-operation-started-in-mahad-nrsr-159811.html”]
नगराध्यक्षांनी सांगितलं की, जिल्हाधिकारी कार्यालयात बोलणे झाले असता, त्यांच्याकडून असं सांगण्यात आले आहे की जरी महाडमधील पुराचे पाणी कमी होत असले तरी महाबळेश्वर येथे पाऊस व त्या पावसाचे नदीला मिळणारे पाणी यामुळे पुन्हा एकदा महाड शहरात पाणी येण्याची शक्यता आहे. तरी आपण सर्व नागरिकांनी घरात न राहता रेस्क्यू होऊन घराबाहेर यावे. किंवा NDRF टिम किंवा लोकल रेस्क्यु टिमच्या मदतीने रेस्क्यु होऊन महाडमधील मोठे इमारत असतील,पोलीस स्टेशन वसहात अशा उंच बिल्डिंग असेल तिथे टेरेसवर जाऊन हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा आपण रेस्क्यू व्हावे.
महाडकरांनी या सूचनांचे पालन करावे,असे स्नेहल जगताप यांनी आवाहन केले आहे.