नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टी, निवडणूक आयोग, प्रफुल पटेल, शरद पवार यांच्यासह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. निवडणूक आयोगावर टीका करताना ते म्हणाले की, पुरावे आमच्याकडून मागण्याऐवजी आयोगानेच नष्ट केले आहेत. प्रफुल पटेल भाजपकडे जाण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता, पवार साहेब हुशारीने खेळवत होते, असे ते म्हणाले. तसेच शिवभोजन थाळी, शेतकरी प्रश्न आणि राज्यातील प्रलंबित निधी यावरही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.