आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु
भारतातील आघाडीचा अल्ट्रा-फास्ट-फॅशन ब्रॅंड लिबास आपल्या वेगवान विस्तारयोजनेच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत आहे. १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील बोरिवली येथे ओबेरॉय स्काय सिटी मॉलमध्ये सुमारे ४००० चौरस फुटांमध्ये पसरलेले नवे स्टोअर त्यांनी सुरु केले. या नव्या शाखेच्या उद्घाटनामुळे लिबासने ऑफलाइन रिटेल मार्केटमधील आपली उपस्थिती अधिक ठळक केली आहे. यामधून २०२५ च्या अखेरपर्यंत देशभरात ५० पेक्षा जास्त दुकाने उघडण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे त्यांनी आणखी एक पाऊल टाकले आहे.
लिबास नेहमीच ‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’ या आपल्या मूळ ध्येयाशी निष्ठावान राहिला आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेचा उत्कृष्ट मेळ दिसून येतो. डिझाईनपासून ते सोर्सिंगपर्यंत आणि ग्राहक अनुभवापर्यंत ब्रॅंडने नेहमीच स्थानिक बाजारपेठेच्या गरजांचा अभ्यास करून पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच नव्या स्टोअर्समध्येही भारतीय स्त्रियांच्या विविध आवडी-निवडी, वैयक्तिक अभिरुची आणि आधुनिक आकांक्षा प्रतिबिंबित होतील.
Stocks to Watch: ऑटो सेक्टरमध्ये तूफान तेजी; Maruti, Tata Motors सह ‘हे’ स्टॉक आघाडीवर!
या विस्ताराबद्दल लिबासचे संस्थापक व सीईओ सिद्धांत केशवानी यांनी सांगितले की, “मुंबईसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत आमचे नवे स्टोअर सुरु करणे हे आमच्या वाढीच्या प्रवासातील निर्णायक पाऊल आहे. आम्ही देशभरातील महिलांना अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘११ स्टेप्स क्लोझर कॅम्पेन’ हा त्याच प्रयत्नांचा एक भाग असून तो भारतातील फॅशन-फॉरवर्ड महिलांना दिलेला मान आहे. आम्ही टियर १ आणि टियर २ शहरांमध्ये विस्तार करत असताना प्रत्येक स्टोअर केवळ खरेदीचे ठिकाण राहणार नाही, तर ग्राहकांशी संवाद साधणारी, त्यांच्या मतांना आदर देणारी आणि त्यांना आवडेल असा फॅशन अनुभव देणारी एक जागा असेल.”
लिबासचा उद्देश केवळ कपडे विकण्याचा नसून फॅशनसाठी एक डिझाईन-प्रेरित, डिजिटली सक्षम आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनुकूल इकोसिस्टम तयार करण्याचा आहे. वाढत्या शहरी बाजारपेठांमध्ये महिलांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. या पार्श्वभूमीवर, लिबास आपल्या आगामी विस्तारामध्ये गती, स्टाइल आणि धोरणात्मक दृष्टिकोनाची सांगड घालणार आहे.
एकूणच, बोरिवलीतील नवे स्टोअर हे लिबासच्या ग्राहकांसाठी पर्वणी आहे. यामुळे देशातील ग्राहकांना आणखी जवळ जाताना ब्रॅंडचा अनुभव अधिक वैविध्यपूर्ण होईल. २०२५ च्या अखेरपर्यंत ५० हून अधिक स्टोअर्स सुरु करण्याचे कंपनीचे मानस आहे.