राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी सावरगाव येथे रिपब्लिकन पार्टी (खरात गट) व सनगाव येथील ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांना आंदोलन कर्त्यांनी इशारा दिला आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करत 30 लाख रुपये वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड हे मागील सात दिवसापासून अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर लोखंडी सावरगाव ते सनगाव येथील रस्ता खोदून 30 लाखाचे शासनाचे नुकसान केले आहे. वेळोवेळी मागणी करूनही संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे काम केले नसल्याने कारवाईची मागणी करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाची दखल घेतली नसल्याने आज सकाळी लोखंडी सावरगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.