Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hemant Dhome : ‘आपलं गावच बरं गड्या’, परदेशातून थेट गावात ‘झिम्मा २’ नंतर हेमंत ढोमेचं पुढचं पाऊल

हेमंत ढोमे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली आहे. उत्तम विषय आणि दमदार कथानक हाताळत हेमंत ढोमे नवा चित्रपट साकारत असतो. आता अशातच अभिनेता लवकरच ‘झिम्मा २’नंतर नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 04, 2024 | 06:26 PM
"तुझा इतिहास खरा की माझा?", सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत...

"तुझा इतिहास खरा की माझा?", सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत...

Follow Us
Close
Follow Us:

Hemant Dhome New Movie : ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘चोरीचा मामला’, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन अभिनेता हेमंत ढोमे याने केलं आहे. हेमंत ढोमे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली आहे. उत्तम विषय आणि दमदार कथानक हाताळत हेमंत ढोमे नवा चित्रपट साकारत असतो. आता अशातच अभिनेता लवकरच ‘झिम्मा २’नंतर नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. यासंदर्भात हेमंत ढोमेने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.

हे देखील वाचा – रांगडं व्यक्तिमत्व अन् नजरेत दरारा, ‘येक नंबर’ चित्रपटाचा धडाकेबाज पोस्टर रिलीज

अभिनेता हेमंत ढोमेने फेटा घातलेला फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, “उद्या होणार फसक्लास… हा फोटो आहे मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या माणसांनी केलेल्या सत्काराचा…त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही त्यांच्यावर…बोलता बोलता माझी भाषा तिथली होते आणि पण लगेच तिथला होतो…प्रचंड प्रेम, आपुलकी आणि खूप जास्त आदर हा मला माझ्या गावाविषयी लहानपणापासूनच होता म्हणजे सगळ्यांनाच असतो… पण मला जरा जास्तच आहे.”

 

“मला कायम वाटायचं माझं गाव आणि आजूबाजूचा परीसर खूप सुंदर आहे! लहानपणी कुठे माहित होतं आपण मोठे झाल्यावर दिग्दर्शक होऊ, निर्माता होऊ? पण आता माझा सातवा चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि माझी आणि क्षितीची म्हणजे आपल्या चलचित्र मंडळीची चौथी निर्मिती असताना मी आणि क्षितीने मनाशी ठरवलं होतं हा चित्रपट आपल्या गावीच बनवायचा… आपल्या भागातले लोक घेऊन आपल्या भागातच चित्रीत करायचा! गंमत बघा माझ्या लाडक्या टिमसोबत आम्हाला आपला हा चित्रपट स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शुट करता आला! लय भारी वाटलं राव!!!”

हे देखील वाचा – ऑन-स्क्रीन शिक्षकांची झलक दाखवणाऱ्या ‘या’ पाच कलाकारांवर टाका नजर!

“आता तो पुर्ण झालाय आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय… कधी, कसा ते सगळं उद्या सांगतोच! पण माझ्या अत्यंत जवळचा विषय… मी जे जगलो, जे पाहिलं अनुभवलं ते सगळं मांडायचा प्रयत्न केलाय… हळू हळू पुढच्या कथांमधून सुद्धा मांडत राहिनच! तर मंडळी माझ्या मातीचा अभिमान आता तुम्हा सगळ्यांना हक्काने सांगायचाय… कोणीतरी म्हणलेलच आहे, “सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो” तर आता वेळ आलीय हे तपासून बघण्याची… तुमच्यासमोर हक्काने पुन्हा एकदा थोडसं चाचपडायची… तर उद्या सग्गळं “फसक्लास” होणार! #पाटलांचा_नवासिनेमा ”

Web Title: Marathi actor and director hemant dhome will announce a new marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 06:26 PM

Topics:  

  • Entertainement News

संबंधित बातम्या

घातक अदांनी घायाळ करणारी आता अ‍ॅक्शन अंदाजात, Rashmika Mandanna च्या ‘मैसा’च्या थ्रिलर धमाक्याला सुरुवात
1

घातक अदांनी घायाळ करणारी आता अ‍ॅक्शन अंदाजात, Rashmika Mandanna च्या ‘मैसा’च्या थ्रिलर धमाक्याला सुरुवात

Zee Marathi : सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण; भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती
2

Zee Marathi : सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण; भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती

Madhubala Biopic: सारा अर्जुनला लागली लॉटरी! ‘Dhurandhar2’मधील यलीना आता साकारणार मधुबाला
3

Madhubala Biopic: सारा अर्जुनला लागली लॉटरी! ‘Dhurandhar2’मधील यलीना आता साकारणार मधुबाला

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.