दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिऱ्यांचा व्यावसायिक मेहुल चोक्सीला डॉमिनिकातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. दरम्यान त्याची पत्नी प्रिती चोक्सीने मेहुलच्या जीवाला धोका असून त्याच कधीही हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. यासोबतच तिने त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही माहिती सादर केली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तीने ही माहिती दिली. 23 मे रोजी रात्री मेहुल जेवण करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर परत आलेच नाहीत. मेहुल गायब झाल्यानंतर काही वेळातच एका सल्लागाराला आणि स्वयंपाकीला मेहुलला शोधायला समुद्र किनारी पाठवले होते. पण त्यांना त्याठिकाणी काहीही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली, असे तीने सांगितले.
चोक्सीची मैत्रीण बार्बरा जैबरिकाबाबत जेव्हा तिला जेव्हा विचारणा केली असताना प्रितीने तिला ओळखत असल्याची माहिती दिली. गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये ती अँटिग्वाला आली होती असे सांगत आयलँडमधील घरीही आली होती, असे तीने स्पष्ट केले. दरम्यान बार्बरा जशी दिसते तशी अजिबात नाही, असेही प्रिती म्हणाली.
दरम्यान चोक्सी भारतीय नागरिक नसल्याचा दावादेखील प्रितीने केला. 2017 मध्येच अँटिग्वाचे नागरिकत्व घेतल्यानंतर भारतीय घटनेतील कलम 9 नुसार चोक्सी आता भारतीय नागरिक नसल्याचा दावा देखील तीने केला. चोक्सीसाठी अँटिग्वाच सर्वात सुरक्षित असल्याचेही ती म्हणाली.
दरम्यान चोक्सीचा भाऊ चेतनने डॉमिनिकात विरोधी पक्षनेते लेनक्स लिंटन यांच्यासोबत दोन तास चर्चा केल्याचे समजते. विरोधक संसदेत चोक्सीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार असतील तर निवडणुकीत देणगी दिली जाईल अशी ऑफरच त्याने दिल्याचे समजते. एवढेच नव्हे तर चेतनने लिंटन यांना दोन लाख डॉलरची रक्कमही दिल्याचा दावा केला जात आहे.
चोक्सीला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सीबीआय अधिकारी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली 6 अधिकाऱ्यांचं एक पथक सध्या डॉमिनिकामध्ये आहे. कोर्टाने चोक्सीच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली तर त्याला तत्काळ खासगी जेट विमानाने दिल्लीत आणले जाईल. दिल्लीत आणल्यानंतर अटक करुन त्याच्यावर पुढील कारवाई सुरू होईल, अशी माहिती सूत्राने दिली.
[read_also content=”बाईचं बाहेर लफड https://www.navarashtra.com/latest-news/immoral-relationships-do-not-mean-that-a-woman-is-not-a-good-mother-high-court-comment-nrvk-137069.html”]
[read_also content=”2051 पर्यंत… https://www.navarashtra.com/latest-news/after-a-few-days-man-will-not-be-able-to-live-on-earth-a-human-newborn-born-in-space-nrvk-136745.html”]
[read_also content=”डोस चुकला असता तर… https://www.navarashtra.com/latest-news/fathers-anguish-for-the-unborn-child-300-km-journey-by-bicycle-for-child-medicine-nrvk-136738.html”]