Photo Credit- Social Media वाल्मिक कराडच्या संपत्तीतून आणखी धक्कादायक धागेदोरे मिळतील
मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच भाजप आमदार सुरेश धस यांनीही या मुद्द्यावर सूचक विधान केले आहे, ज्यामुळे प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायासाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमदार सुरेश धस मुंबईत आले होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वाल्मिक कराडबाबत पुन्हा वेगवेगळे दावे केले आहेत. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या एसआयटीच्या हालचालींविषयी विचारले असता, धस म्हणाले की, कराड यांची संपत्ती जप्त होणे आवश्यक आहे. त्याची संपत्ती जप्त केल्यास या संपत्तीशी संबंधित इतर अनेक धागेदोरे उघड होऊ शकतात, ज्यामुळे या प्रकरणाचे आणखी पैलू समोर येतील.
Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; सर्व दौरे रद्द
सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे. यातला एकही आरोपी सुटता कामा नये. पण या प्रकरणाला जास्त वेळ लागू नये यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा. या लोकांना लवकरात लवकर फाशी दिली तरच असे गुन्हे पुन्हा कुणी करण्याची हिंमत करणार नाही, असा निकाल लागला पाहिजे, या प्रकरणात एसआयटी जो तपास करत आहे तो योग्य दिशेने करत आहे असा मला वाटतं.
दरम्यान, एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे सुरेश धसही मुंबईत दाखल झाले आहेत. बीडमध्ये आणखीही अशा घटना घडल्या आहेत त्याचा पाठपुरावा तुम्ही करणार का या प्रश्नावर उत्तर देताना धस म्हणाले, आता मी महादेव मुंडेंचं प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. याशिवाय संदीप दिघोळेचं प्रकरणाचीही माहिती काढली आहे. बीडमध्ये अनेक लोकांचे खून झाले आहेत. त्याचा उल्लेख करणं म्हणजे काय पाप आहे का? यातील बहुतांश मर्डर हे राजकीय मर्डर आहेत, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक, तब्बल 15 लाखांना घात