Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभगाने मुंबईत रेड अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार नाही तर मुसळधार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र रेड अलर्ट कायम असणार आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 13, 2021 | 08:48 AM
दोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पहिल्याच पावसानं मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. आज पावसानं थोडी उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मागचं कारण म्हणजे भारतीय हवामान विभागानं मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता.

हवामान विभगाने मुंबईत रेड अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार नाही तर मुसळधार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र रेड अलर्ट कायम असणार आहे.

सुप्रभात, मुंबई! आज, उद्या व परवा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कृपया बाहेर पडणे टाळा, व समुद्रकिनारी जाऊ नका.#MyBMCMonsoonUpdate — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 12, 2021

 

दुसरीकडे पश्चिम, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Latest satellite image at 8.30hrs indicate clouds over south coast of Maharashtra mostly & further down & over Arabian Sea.North Konkan partly cloudy sky. Ratnagiri Raigad, Sindudurg, Goa Karnataka Kerala coast could receive good rains in coming 3,4hrs.
Parts of interior Mah too. pic.twitter.com/JH6uJcNf5Q
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 13, 2021

मुंबईमध्ये सध्या तरी पावसाच्या हलक्या सरी किंवा उघड झाप सुरू आहे. मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

नवी मुंबईध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून मध्यम तसंच हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय. रात्री पावसानं विश्राती घेतली होती. त्यानंतर पुन्हा सकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. हवामान खात्याने मुसळधार पावसाबाबत वर्तवलेला अंदाज रायगड जिल्ह्यात मात्र काहीसा चुकताना दिसतो आहे.

Mumbai Thane realised moderate to heavy rains in last 24 hrs at 8.30am today morning as seen below. Intense spells of rains yesterday morning in Mumbai, in later part of the remained light to mod only, probably due to weakening of circulation in Arabian Sea.
Pl see IMD updates. pic.twitter.com/Oqw6xBd4kA
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 13, 2021

दक्षिण रायगडमधील महाड पोलादपूर या मोठ्या पावसाच्या विभागासह अलिबाग पेण मुरुड तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचेच चित्र आहे. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रायगड, पालघर, रत्नागिरीला आजही रेड अलर्ट आहे. सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

mumbai rains alert imd weather report raigad ratnagiri navi mumbai heavy rainfall today weather updates

Web Title: Mumbai rains alert imd weather report raigad ratnagiri navi mumbai heavy rainfall today weather updates nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2021 | 08:48 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • weather updates

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक
1

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील
2

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai Election : नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार
3

Navi Mumbai Election : नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…,  मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
4

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.