Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anti Terror Mock Drill : नवी मुंबईत CISF, NSG, ATS आणि पोलिसांचा संयुक्त सराव; आपत्कालीन यंत्रणेची तपासणी

Anti Terror Mock Drill : नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये CISF, NSG, महाराष्ट्र पोलिस, ATS आणि BDDS यांच्या सहभागातून संयुक्त दहशतवादविरोधी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 09, 2026 | 07:57 PM
Anti Terror Mock Drill : नवी मुंबईत CISF, NSG, ATS आणि पोलिसांचा संयुक्त सराव; आपत्कालीन यंत्रणेची तपासणी

Anti Terror Mock Drill : नवी मुंबईत CISF, NSG, ATS आणि पोलिसांचा संयुक्त सराव; आपत्कालीन यंत्रणेची तपासणी

Follow Us
Follow Us:
  • बंधक परिस्थितीचे प्रात्यक्षिक
  • विविध यंत्रणांमधील समन्वयाची तपासणी
  • रिलायन्स कॉर्पोरेट पार्कात मॉक ड्रिल
 

नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क (RCP) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) वतीने संयुक्त वार्षिक दहशतवादविरोधी मॉक ड्रिल (Anti Terror Mock Drill) आयोजित करण्यात आली. दहशतवादी हल्ला आणि बंधक परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षा यंत्रणांकडून कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातो, याची चाचपणी या सरावाद्वारे करण्यात आली.

सोमवारी झालेल्या या सरावात सीआयएसएफ, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), महाराष्ट्र पोलिस, दहशतवादविरोधी पथक (ATS), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच अन्य संबंधित यंत्रणांनी सहभाग घेतला. दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध यंत्रणांची सज्जता, प्रतिसाद यंत्रणा आणि परस्पर समन्वय तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.

संभाव्य सुरक्षा धोक्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी संयुक्त कारवाईची क्षमता तपासण्याची तसेच सहभागी यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याची संधी या सरावातून मिळाली.

जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादविरोधी सराव

दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा पोलिस आणि लष्कराच्या 13 राष्ट्रीय रायफल्सने अरागम येथे आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त मॉक ड्रिल आयोजित केली होती. या सरावात अरागम पोलिस ठाणे, लष्कराचे जवान आणि अन्य यंत्रणांनी सहभाग घेतला होता.

Mumbai Pune Expressway : पनवेलच्या वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! अटल सेतू-पुणे एक्स्प्रेसवे जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण

स्फोटक सामग्रीचा शोध घेण्याचा सराव

या काल्पनिक सरावादरम्यान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दहशतवादी लपल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. संयुक्त पथकाने त्याचा शोध घेऊन नियोजित प्रक्रियेनुसार त्याला निष्प्रभ केले. त्यानंतर परिसराची तपासणी करून संशयास्पद स्फोटक सामग्रीचा शोध घेण्याचा सराव करण्यात आला.

या वेळी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिकांची तैनाती आणि काल्पनिक जखमींवर उपचार करण्याच्या व्यवस्थांचीही चाचणी घेण्यात आली. संपूर्ण परिसराची तपासणी करून तो सुरक्षित घोषित केल्यानंतर सराव पूर्ण झाला. सहभागी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि सुधारणांची आवश्यकता असलेल्या बाबींचा आढावा घेण्यासाठी चर्चासत्रही आयोजित करण्यात आले.

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबईत संयुक्त दहशतवादविरोधी मॉक ड्रिल कुठे आयोजित करण्यात आली?

    Ans: रिलायन्स कॉर्पोरेट पार्क (आरसीपी), नवी मुंबई येथे ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली.

  • Que: या मॉक ड्रिलमध्ये कोणत्या यंत्रणांनी सहभाग घेतला?

    Ans: सीआयएसएफ, एनएसजी, महाराष्ट्र पोलिस, एटीएस, बीडीडीएस आणि अन्य संबंधित यंत्रणांनी सहभाग घेतला.

  • Que: या सरावाचा मुख्य उद्देश काय होता?

    Ans: दहशतवादी हल्ला किंवा बंधक परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षा यंत्रणांची सज्जता, प्रतिसाद क्षमता आणि परस्पर समन्वय तपासणे हा मुख्य उद्देश होता.

Web Title: Navi mumbai cisf joint anti terror mock drill rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • ats
  • Mock Drill
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Panvel Fire News: पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना; अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ!
1

Panvel Fire News: पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना; अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ!

Navi Mumbai News: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा! सेवानिवृत्त आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार सानुग्रह अनुदान
2

Navi Mumbai News: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा! सेवानिवृत्त आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार सानुग्रह अनुदान

Navi Mumbai News: कोपरखैरणेतील नाखवा मच्छी मार्केटमधील महिलांचा व्यवसाय संकटात; अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
3

Navi Mumbai News: कोपरखैरणेतील नाखवा मच्छी मार्केटमधील महिलांचा व्यवसाय संकटात; अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.