Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amol Mitkari on Rajan Patil: “…. वाया गेलेली मोकाट कार्टी! अजित पवारांना डिवचणाऱ्यांवर मिटकरींची जहरी टीका

उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केलेल्या थेट चॅलेंजवर आमदार अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2025 | 04:33 PM
NCP Amol Mitkari tweet on Balasaheb Rajan patil for targeting ajit pawar in local body elections

NCP Amol Mitkari tweet on Balasaheb Rajan patil for targeting ajit pawar in local body elections

Follow Us
Close
Follow Us:

Amol Mitkari on Rajan Patil: मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक ही जोरदार चर्चेत आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदावरुन वाद निर्माण झाला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केलेल्या थेट चॅलेंजवर आमदार अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केली आहे.

अनगरमधून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला. मात्र त्यांच्या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये अडकला आणि बाद झाला. मात्र यानंतर राजन पाटील यांच्या चिरंजीवाने केलेल्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनगर नगरपंचायतच्या समोर राजन पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आणि जल्लोष केला.

राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी ह्याना सत्तेचा अति माज आलाय.ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्या बद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तूर्तास या औल्यादी च्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल..तुर्तास इतकेच — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 19, 2025

मात्र हा आनंद व्यक्त करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट चॅलेंज दिले. यामध्ये बाळाराजे पाटील यांनी अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही…असे म्हटले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर आता अजित पवार गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज दिल्यानंतर अमोल मिटकरी यांनी राजन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी लिहिले आहे की, राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी ह्याना सत्तेचा अति माज आलाय.ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्या बद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तूर्तास या औल्यादी च्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल..तुर्तास इतकेच…, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. यानंतर आता नगरपंचायत झाल्यानंतर देखील पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद केला. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवार अर्ज बाद करताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून काहीसे विचित्र कारण सांगण्यात आले. उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवार अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती, असे तांत्रिक कारण देऊन त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरुन घेताना या प्राथमिक गोष्टींची तपासणी करणे आवश्यक असते. तसेच बहुतांश वेळा सूचक असलेली व्यक्ती निवडणूक अधिकाऱ्यासमोरच सही करते. माझ्या मुलाने सूचक म्हणून माझ्या उमेदवारी अर्जावर सही केली होती. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचक कोण आहे, असे विचारले होते. मात्र, आता सूचक असलेल्या व्यक्तीच्या रकान्यात असलेली सही गायब झाली आहे. त्यासाठी निवडणूक कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले पाहिजेत, अशी मागणी उज्ज्वला थिटे यांनी केली.

Web Title: Ncp amol mitkari tweet on balasaheb rajan patil for targeting ajit pawar in local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • ajit pawar
  • amol mitkari
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
1

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा
2

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा

तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे ‘दीप’ आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट
3

तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे ‘दीप’ आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

Maharashtra Politics : “निरोप समारंभाच्या फोटोत तुम्ही हवे होता…; अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट
4

Maharashtra Politics : “निरोप समारंभाच्या फोटोत तुम्ही हवे होता…; अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.