corona patients
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालय आणि निती आयोगाने गुरुवारी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती कथन करणारी आकडेवारी जाहीर केली. पत्रकार परिषदेत सरकारने न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या अहवालाचाही उल्लेख केला, ज्यात भारतात कोरोनामुळे ४० लाख मृत्यू झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांच्या मते, ही आकडेवारी चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आली आहे. यात अशा कलुषित विचारांचा आधार घेण्यात आलाय, ज्याची माहिती फोनवरुन घेऊन हा अहवाल संकलित करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या मते, न्यूयॉर्क टाइम्सच्या या अहवालात काहीही तथ्य नाही.
[read_also content=”WhatsApp कॉल आणि मेसेज चेक करण्यासंदर्भात सरकार घेणार ही दखल? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं नेमकं सत्य https://www.navarashtra.com/latest-news/government-is-not-going-to-check-record-your-whatsapp-all-neither-extra-red-tick-introduced-know-truth-behind-viral-message-nrvb-134749.html”]
[read_also content=”फणसाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर तितक्याच धोकादायकही; रक्त पातळ करण्यासाठी म्हणून खाणार असाल तर ठरू शकतात घातक, जाणून घ्या नेमकं कारण https://www.navarashtra.com/latest-news/jackfruit-seeds-are-equally-dangerous-for-health-nrvb-134744.html”]
भारतात आजवर अधिकाधिक २.६९ कोटी लोकं कोरोना बाधित झाली असून ३.०७ लाख लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. देशात आजमितीला २४ लाख, १५ हजार ७६१२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ११ हजार २७५ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. याहून अधिक, म्हणजेच २ लाख ८२ हजार ९२४ रुग्ण बरे झाले आहेत. ३,८४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सने भारतात मृत्यूच्या आकडेवारीचे योग्य अनुमान काढण्यासाठी एक डझनहून अधिक तज्ज्ञांची मदत घेतली. या तज्ज्ञांनी भारतात महामारीची तीन भागांत विभागणी केली- सामान्य स्थिती, खराब स्थिती, अत्यंत खराब स्थिती.
अत्यंत खराब स्थितीच्या अहवालात संक्रमणाचे वास्तविक आकडेवारी २६ टक्के अधिक संक्रमणाचे अनुमान लावण्यात आले. संक्रमणाने मृत्यूदराचेही अनुमान ०.६०% ठेवण्यात आले. हे अनुमान कोरोनाची दुसरी लाट आणि देशाची ढासळलेली आरोग्य व्यवस्था पाहून लावण्यात आले आहे. या स्थितीत ७० कोटी लोक संक्रमित झाले असल्याची आणि ४२ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे अनुमान लावण्यात आले.
on new york times narendra modi government report niti ayog on corona deaths in india