Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिरीश चौधरी यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ; तीन दिवसांची कोठडी देण्यास न्यायालयाचा नकार

भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी ...

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 19, 2021 | 08:34 PM
गिरीश चौधरी यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ; तीन दिवसांची कोठडी देण्यास न्यायालयाचा नकार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai). भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली.

[read_also content=”मुंबई/ राजकीय आरक्षणासंदर्भात भाजपाची भूमिका विचारण्याचा अन्य पक्षांना नैतिक अधिकार नाही- प्रवीण दरेकर https://www.navarashtra.com/latest-news/other-parties-have-no-moral-right-to-question-the-bjps-role-in-political-reservation-praveen-darekar-nrat-158228.html”]

नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद करत एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या प्रकरणी नाव समोर आल्यानंतर गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. सोमवारी कोठडी संपत असल्याने चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले.

तेव्हा, मनी लॉड्रिंग प्रकरणात तपास अद्याप पूर्ण झाला नसून अधिक चौकशी करण्यासाठी चौधरी यांना तीन दिवसांची कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने करण्यात आली. मात्र, त्यांची मागणी अमान्य करत न्यायालयाने चौधरी यांच्या कोठडीत २० जुलैपर्यंत एक दिवसाची वाढ केली.

Web Title: One day extension in girish chaudhary custody the court refused to grant him three days remand nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2021 | 08:34 PM

Topics:  

  • eknath khadse
  • MIDC Police
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
1

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?
2

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
3

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.