Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीचं एक मत फुटलं; विधान परिषदेमध्ये पराभव झालेल्या जयंत पाटील यांचा दावा

विधान परिषदेच्या निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये शरद पवार यांचा पाठिंबा असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेत पराभवाचा कारण स्पष्ट केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 13, 2024 | 05:56 PM
जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती. यावेळी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. भाजपचे पाच उमेदवार होते त्यासाठी भाजपकडे संख्याबळ देखील कमी होते. काँग्रेसकडे अधिकचे मत उपलब्ध होते. विधान परिषदेचे काँग्रेसची मतं फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीतील शरर पवार यांचा पाठिंबा असलेले जयंत पाटील पराभूत झाले. या पराभवानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे मत फुटले असल्याचा मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले शेकाप नेते जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या पराभवाच्या नेमक्या कारणाचा विस्तार करुन सांगितला. तसेच शरद पवार यांची त्यांच्यामागे ताकद उभी असल्याचा दावा निवडणूकीपूर्वी केला जात होता. मात्र त्यांचे देखील मत फुटल्याचा दावा शेकाप नेते जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, “मी पराभवाचं आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. थोडंफार इकडे-तिकडे व्हायचं. मी निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असं घडत असेल तर जनतेनं दोन्ही सभागृहं कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे”, असं ते म्हणाले.

पुढे त्यांनी राष्ट्रवादीचे मत फुटले असल्याचा दावा केला. जयंत पाटील म्हणाले, “मी राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो. त्यातलं एक मत फुटलं. आमचीही मतं फुटली. मला जर चार मतं मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत मी २५ ते ३० मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं”, असं म्हणत शरद पवार गटाची पूर्ण १२ मतं आपल्याला मिळाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली दुनियेची मतं फुटली तर त्यांच्या एका मताचं काय घेऊन बसलात?” अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

Web Title: One vote of ncp sharad pawar group split claim b yjayant patil in legislative council elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 05:56 PM

Topics:  

  • jayant patil
  • Sharad Pawar Group

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.