लॉकडाऊनमुळे नाट्यगृह बंद आहेत. ती केव्हा सुरु होणार याची कुणालाही कल्पना नाही. या अनिश्चिततेच्या काळात प्रशांत दामले यांनी लोकांची मते जाणून घेण्यासाठी एक अभियान सुरु केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर त्यांनी एका फॉर्मची लिंक दिली आहे.
आपल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये प्रशांत दामले म्हणतात की, मुंबई पुणे नाशिक मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सोलापुर येथील नाट्यरसिकहो हा एवडुसा फॉर्म भराल का? त्यानंतर https://forms.gle/RBeUqV7D1Qweo4YV6 ही लिंक त्यांनी शेअर केली आहे.
या फॉर्मच्या माध्यमातून जी लोकांच्या आवडीनिवडीबाबतची माहिती गोळा होईल त्याद्वारे नव्या नाटकांची निर्मिती करायला मदत होईल, असे प्रशांत दामले सांगतात. लोकांशी संवाद साधण्याचा एक नवा फॉर्मच प्रशांत दामले यांनी सुरु केला आहे. नाट्यगृहे सुरु झाल्यानंतर एका नव्या स्वरुपात नाटक पाहायला मिळेल, हा आशावाद प्रशांत दामलेंच्या पोस्टमधून व्यक्त होतो.






