Teacher Student Relationship ( शिक्षक-विद्यार्थी संबंध )
या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल क्लासरुम चक्क ‘डान्स फ्लोअर’ बनला, यात शिक्षकाचा धम्माल व्हिडिओ आणि अंदाज पाहून लहान मुलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. चढून बेंचवर चढुन फुल एनर्जीमध्ये डान्स करायला लागले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.
Such a wonderful video..!! Every child deserves such happiness and fun. A little break from studies keeps them refreshed and stress-free. Hats off to the amazing teacher for spreading so much joy..!! ❤️ https://t.co/k3sPsSMf2c — Subhash Bagaria (@techsolutions92) November 3, 2026
नेटकऱ्यांनी या शिक्षकांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. सततच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी अशा मनोरंजक क्षणांची गरज असते. त्यामुळे मुलांना थोडा विरंगुळा मिळतो, त्यांचा मूड फ्रेश होतो आणि ते नव्या उत्साहाने पुन्हा अभ्यासात रमू शकतात, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
त्यांनी शिक्षकांचे कौतुक करताना लिहिले की, अभ्यासाच्या धावपळीत मुलांना असा विरंगुळा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचा मानसिक ताण नाहीसा होईल आणि ते पुन्हा फ्रेश होतील.
शिक्षकाची भूमिका केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसते, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांना आनंदाचे क्षण देणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच गोष्टीची प्रचिती या व्हिडिओतून येत असून, सोशल मीडियावर शिक्षकांचे भरभरून कौतुक केले जात आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, ‘यालाच म्हणतात खरी समजदारी’, अशा शब्दांत शिक्षकांचे कौतुक केले आहे.






