अमरावती (Amravati). पंतप्रधान पीकविमा योजनेतील (Prime Minister Crop Insurance Scheme) निकषांतील त्रुटींमुळे शेतकरी बांधवांना वेळेवर व योग्य परतावा मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बदल व सुधारणा व्हावी जेणेकरून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना विम्याचा लाभ मिळेल, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thakare) यांच्याकडे केली आहे. (Crop-insurance-plan-criteria-need-to-be-changed)
[read_also content=”मुंबई/ नाना पटोलेंच्या समोर कार्यकर्त्याने केला भाजपचा जयजयकार! काॅंग्रेसचे कार्यकर्ते झाले अचंबित https://www.navarashtra.com/latest-news/activist-cheered-bjp-in-front-of-nana-patole-congress-workers-were-shocked-nrat-141055.html”]
केंद्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली. या योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान पीकविमा योजनेत केवळ विमा कंपन्यांना फायदा होत असून, शेतकऱ्यांना होत नाही. पीकविमा योजनेंतर्गत परतावा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही तसेच मिळाला तरी तो खूप उशिरा व अल्पप्रमाणात मिळतो.
याबाबत केंद्र शासनाकडून तालुका आणि जिल्हास्तरावर तक्रारी निवारणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. पीकविम्याचा परतावा देण्यास कंपनी विलंब करीत असेल तर कंपनीला दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली नाही, असे पालकमंत्र्यांनी निवेदनात नमूद केले आहे.