महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ असा नारा दिलाय.
पुणे: कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास अल्पवयीन दुचाकीचालक मुलाने विरोध केला. तेव्हा झटापटीत वाहतूक पोलिसाचा मोबाइल पडून नुकसान झाले. मुलगा अल्पवयीन असताना त्याला दुचाकी दिल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी वडिलांवर गुन्हा दाखल केला. याबाबत विश्रामबाग वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई उमेश नरुटे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील नागनाथ पार परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस कारवाई करत होते. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास अल्पवयीन मुलगा दुचाकीवरुन निघाला होता. पोलिसांनी त्याला थांबविले. परवान्याबाबत विचारणा केली. तेव्हा मुलाकडे परवाना नसल्याचे आढळून आले. पोलीस शिपाई नरुटे यांनी मोबाइलवरुन चित्रीकरण केले. तेव्हा मुलाने कारवाईस विरोध केला. झटापटीत नरुटे यांचा मोबाइल रस्त्यावर पडला आणि मोबाईलचे नुकसान झाले. मुलगा अल्पवयीन असल्याची जाणीव असताना त्याला दुचाकी वापरण्यास दिल्याप्रकरणी त्याच्या वडिलांवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गणेश फरतडे तपास करत आहेत.
पुण्यात नागरिकाला बेदम मारहाण
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मेसमधील कचरा रस्त्यावर का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे घडली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिसांत अमित भारत शिंदे (वय २७, रा. गंज पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारीला सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
हेही वाचा: पुण्यात नागरिकाला बेदम मारहाण; बादली डोक्यात घातली अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरातील एका सोसायटीत मेस आहे. आरोपी मेसमधील कचरा रस्त्यावर फेकत असे. त्यामुळे तक्रारदाराने आरोपीला त्याबाबत विचारणा केली. त्याचा आरोपीला राग आला. त्याने तक्रारदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच, कचऱ्याची प्लॅस्टिकची बादली तक्रारदाराच्या डोक्यात मारली. त्यामुळे तक्रारदार जखमी झाले. तसेच, झटापट करून हाताने मारले. या भांडणात तक्रारदाराच्या गळ्यातील चांदीची चार तोळे वजनाची साखळी आणि त्यामधील सोन्याचे पाच ग्रॅमचे पान पडून गहाळ झाले.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.