Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांना घडवणे सर्वात आव्हानात्मक काम ; सरपंच सुर्यकांत सवाणे यांचे मत

मुलांना घडवणे हे काम सर्वात आव्हानात्मक काम असून पूर्वी हे काम फक्त आईचे होते.  परंतु,  आता वडीलही तितकेच जबाबदार असल्याचे मत डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे यांनी  व्यक्त केले

  • By Aparna
Updated On: Oct 13, 2022 | 04:01 PM
मुलांना घडवणे सर्वात आव्हानात्मक काम ; सरपंच सुर्यकांत सवाणे यांचे मत
Follow Us
Close
Follow Us:
भिगवण : मुलांना घडवणे हे काम सर्वात आव्हानात्मक काम असून पूर्वी हे काम फक्त आईचे होते.  परंतु,  आता वडीलही तितकेच जबाबदार असल्याचे मत डिकसळचे (Diksal Village)सरपंच सुर्यकांत सवाणे यांनी  व्यक्त केले.डिकसळ येथील सारंग सुहास गायकवाड याला नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्याने तसेच त्याची राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेसाठी निवड झाल्याने सरपंच सवाणे यांच्या हस्ते त्याचा  सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी रमेश माळी, कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी, भारतीय जनता पार्टीचे   तालुका उपाध्यक्ष सुनील काळे, योगेश्वरी सोसायटीचे संचालक सतीश काळे, सामाजिक कार्यकर्ते विनायक काळे, योगेश्वरी सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन सोमनाथ भादेकर, जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र झाकणे, युवा नेत्रुत्व पै. योगेश पवार, संतोष पवार, विहान अमोल भोंग आदी  उपस्थित होते. सारंग गायकवाड हा बिल्ट कंपनी शाखेतील विद्या प्रतिष्ठान या विद्यालयातील  सहावीचा विद्यार्थी आहे. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी बारामती विभागातून ४५ व महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना साहेबराव ओव्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

– उत्तम पालक होण्याचा प्रयत्न करावा
सरपंच सुर्यकांत सवाणे यांनी सांगितले की, घरातील मुलांसाठी पालकांनी उत्तम पालक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलगा पडला की त्याला उचलायला जाऊ नका.  त्याला स्वतःहून उठू द्या.  अंगावरील धूळ झटकू द्या.  मुलांना हवं ते करू द्या ते करू शकतात असे म्हणत  यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. व्यायाम शरीर मन आणि आत्मा यांना संतुलित आणतो म्हणून मुलांना व्यायामाचे महत्व पटवून द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गवळी  यांनी केले तर आभार सुहास गायकवाड यांनी मानले.

Web Title: Raising children is the most challenging task opinion of sarpanch suryakant sawane nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 03:03 PM

Topics:  

  • Bhigwan
  • maharashtra
  • Pune
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
1

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
2

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
3

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.