Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बस कंडक्टर ते सुपरस्टार; मराठी कुटुंबात जन्म झालेल्या ‘रजनीकांत’ला कसा मिळाला पहिला चित्रपट ?

आज रजनीकांत यांचा ७४ वा वाढदिवस आहे. रजनीकांतने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जगभरात प्रेक्षकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण केलं आहे. पण रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 12, 2024 | 07:45 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

शिवाजीराव गायकवाड म्हणजेच टॉलिवूड इंड्स्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत होय. नेहमीच रजनीकांत यांचं नाव जरी आपण उच्चारलं तरीही आपल्या समोर एका क्षणात नाणं उडवणारा ‘शिवाजी: द बॉस’ चित्रपटातला शिवाजी राव गायकवाड येतो, त्यानंतर सिगारेट ओढणारा मोंडरू मुगम चित्रपटातला नजरे समोर येतो, तर पाईप ओढणारा उझाईपल्ली चित्रपटातला रजनीकांत आपल्या नजरेसमोर येतो. अशा अनेक वेगवेगळ्या चित्रपटातल्या सीन्सने अभिनेता रजनीकांत एकट्या दक्षिण भारतात नाही तर अवघ्या देशात आणि जगभरात प्रसिद्ध झाला आहे. अशा या बहुआयामी कलाकाराचा आज अर्थात १२ डिसेंबरला ७४ वा वाढदिवस आहे.

अभिनेता आजपासून ७४ व्या वर्षात पदार्पण करतोय. त्याचं आज इतकं वय झालं असलं तरीही त्यांच्या अभिनयाची जादू अजूनही चाहत्यांमध्ये तसूभरही कमी झालेली नाही. रजनीकांतने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जगभरात प्रेक्षकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण केलं आहे. पण रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?

जान्हवी किल्लेकरने शेअर केली बिग बॉसची आठवण; पोस्ट केले फोटोज

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर मधल्या एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांच्या आई वडिलांच नाव रामोजीराव गायकवाड आणि जिजाबाई गायकवाड असं आहे. बंगळूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत बस कंडक्टर म्हणून काम करू लागले. त्यावेळी त्यांची तोंडाने शिट्टी वाजवण्याची कला लोकप्रिय झाली होती. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करण्याआधी रजनीकांत कंडक्टर म्हणून काम करायचे. हिरो व्हायचं स्वप्न बाळगून त्यांनी मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र असतो, जो आपल्याला मोलाचा सल्ला देतोच. त्याप्रमाणेच रजनीकांत यांनाही त्यांच्या मित्राने एक महत्वाचा सल्ला दिला.

मुलगी अनुराग कश्यपची पण लग्न केले करण जोहरच्या चित्रपटाप्रमाणे, २३ व्या वर्षी बांधली स्वप्नवत लग्नगाठ

रजनीकांत यांचं हिरो होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा मित्र राज बहादुर यांनी त्यांना साथ दिली आहे. राज बहादुर यांनी रजनीकांत यांना मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याला सल्ला दिला होता. रजनीकांत यांना १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘अपूर्वा रागनगाल’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिला ब्रेक मिळाला. पण १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अंधा कानून’ या चित्रपटामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरुवात दोन हजार रुपयांपासून केली होती. त्यांनी करियरच्या सुरुवातीला श्रीदेवींसोबत एका चित्रपट केला होता. त्या चित्रपटासाठी रजनीकांत यांना दोन हजार रुपये इतकी फी मिळाली होती. पण असं असलं तरीही ते आजच्या घडीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचा समावेश केला जातो.

समांथाला हवाय प्रेमळ अन् प्रामाणिक जोडीदार, असं आहे २०२५ चं व्हिजन

रजनीकांत यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली भाषेतील सिनेमांत काम केलं आहे. रजनीकांत हे भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. ‘जेलर’ या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी ११० कोटी रुपये इतकी फी घेतली होती. चित्रपटांसह रजनीकांत यांना महागड्या, आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. भारताबाहेरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं आहे. रजनीकांत यांनी राजकारणातही एन्ट्री घेतली होती. रजनीकांत आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचाही हा अपकमिंग ॲक्शन थ्रिलर चित्रपट येत्या २०२५ या वर्षातच रिलीज होण्याची शक्यता आहे.

Web Title: Rajinikanth birthday special thalaiva rajinikanth struggle success story how south superstar get his first film uncrowned king of the film industry rajinikanth property income net worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • Rajinikanth
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘द राजा साब’ ला दुसऱ्याच दिवशी मोठ झटका! चित्रपटाच्या कमाईत ५०% घट; तर, ‘धुरंधर’ने ओलांडला ८०० कोटींचा टप्पा
1

‘द राजा साब’ ला दुसऱ्याच दिवशी मोठ झटका! चित्रपटाच्या कमाईत ५०% घट; तर, ‘धुरंधर’ने ओलांडला ८०० कोटींचा टप्पा

‘आमचा जन्म होताच शोषण केले जाते..’ साऊथ अभिनेत्रीने बालपणीच्या घृणास्पद घटनेबद्दल केला खुलासा
2

‘आमचा जन्म होताच शोषण केले जाते..’ साऊथ अभिनेत्रीने बालपणीच्या घृणास्पद घटनेबद्दल केला खुलासा

‘जन नायकन’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मिळाले नाही प्रमाणपत्र, मद्रास HC प्रदर्शनाच्या २ दिवस आधी घेणार निर्णय
3

‘जन नायकन’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मिळाले नाही प्रमाणपत्र, मद्रास HC प्रदर्शनाच्या २ दिवस आधी घेणार निर्णय

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स
4

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.