मुलगी अनुराग कश्यपची पण लग्न केले करण जोहरच्या चित्रपटाप्रमाणे, २३ व्या वर्षी बांधली स्वप्नवत लग्नगाठ
प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यपने वयाच्या २३ व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या लेकीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ती तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर ह्याला डेट करत होती. अखेर या कपलने आता लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नातले काही फोटोज् आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समांथाला हवाय प्रेमळ अन् प्रामाणिक जोडीदार, असं आहे २०२५ चं व्हिजन
लग्नाच्यावेळी आलियाची ग्रँड एन्ट्री झालेली पाहायला मिळाली आहे. तिने लग्नामध्ये राणी कलरचा सुंदर घागरा वेअर करत तिने एन्ट्री केली. यावेळी तिने एन्ट्री तिच्या मैत्रिणींसोबत घेतली. त्यानंतर लग्नमंडपात तिने नवऱ्याला मिठी मारत त्याला किस केलं. दोघांचाही हा रोमँटिक सीन सध्या कमालीचा चर्चेत आलं आहे. बॉलिवूड बबलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दोघंही एकमेकांना हार घालताना दिसत आहे. त्यानंतर त्यांनी एकमेकांना किस सुद्धा केलं.
अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आलिया कश्यप २३ वर्षांचीच आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये आलियाने शेनसोबत साखरपुड्याचा कार्यक्रम ग्रँड पद्धतीने ठेवला होता. आलिया आणि शेन दोघंही गेल्या अने वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहत होते. पण 2023 मध्ये शेनने आलियाला लग्नासाठी विचारलं. त्यानंतर त्या दोघांनी साखरपुडाही उरकला. २०२३ मध्ये साखरपुडा केला तेव्हा ती २२ वर्षांची होती. आता साधारण वर्षभराने हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.
सर्वाधिक लोकप्रिय भारतीय १० चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर; नंबर १ वर कोणती कलाकृती
अनुराग कश्यपच्या लेकीचं लग्न मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकॉर्स येथे पार पडत आहे. आलिया तिच्या सोशल मीडियावर शेनसोबतचे बरेच फोटो शेअर करत असते. अनुराग कश्यपचा जावई हा एक उद्योजक असून तो मूळचा अमेरिकेचा आहे. २४ व्या वर्षीच तो उद्योजक म्हणून नावारुपाला आला आहे. तर आलिया कश्यप युट्युबर आहे. आलिया कश्यपच्या लग्नाच्या विधींना रविवारपासून ८ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत.