समंथाची जिद्द पडतेय तिच्या आजारांवर भारी, ठरतेय रुग्णांसाठीही आदर्श; 'या' आजाराने त्रस्त असूनही करतेय वर्कआऊट
गेल्या काही दिवसांपूर्वी टॉलिवूड अभिनेता नाग चैतन्य याने अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. नागा चैतन्यने २०१७ साली अभिनेत्री समांथा रुथ प्रभूसोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच २०२१ मध्ये त्या दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला. नागा चैतन्यने समांथाला घटस्फोट दिल्यानंतर तीन वर्षातच दुसऱ्यांदा लग्न केलं. पण समांथाने अद्यापही लग्न केलेले नाही. ती एकटीच आहे. समांथाने २०२५ मध्ये लाईफ पार्टनरसाठी एका प्रामाणिक जोडीदाराची इच्छा व्यक्त केली आहे.
सर्वाधिक लोकप्रिय भारतीय १० चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर; नंबर १ वर कोणती कलाकृती
काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या मनातली इच्छा सांगितली आहे. अभिनेत्रीने आता पूर्व पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर तिनेसुद्धा एका प्रामाणिक पार्टनरची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचसोबत आयुष्यातील एकटेपणा दूर व्हावा, यासाठी तिने प्रार्थना केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये समांथाने, २०२५ साठी वृषभ, कन्या आणि मकर या तीन राशींचं भविष्य सांगितलं आहे. समंथाच्या या पोस्टच्या मते, वृषभ, कन्या आणि मकर या तीन राशींच्या लोकांसाठी येणारं हे नवीन वर्ष हे कमाई आणि प्रगतीच्या दृष्टीने खूप चांगलं असेल. आयुष्यात आणि करिअरमध्ये वाढ होईल, आर्थिक स्थिरता आणि एकनिष्ठ आणि प्रेमळ जोडीदार मिळेल, मोठी उद्दिष्टे पूर्ण होतील, मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळेल आणि आई व्हायचं असेल तर पुढील वर्ष त्यासाठी योग्य राहिलं. ही पोस्ट करत समांथाने त्यावर “आमेन” असं लिहून प्रार्थना केली आहे.
अखेर प्रतीक्षा संपली! हा स्पर्धक बनला नवीन टाइम गॉड; आता घरात सुरु होणार नवा कहर?
समांथा आणि नाग चैतन्यने २०१७ मध्ये गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं होतं. पण, लग्नाच्या चार वर्षातच समांथा आणि नाग चैतन्यचा घटस्फोट झाला. २०२१ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी घटस्फोटाची माहिती दिली होत. घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर नाग चैतन्य टॉलिवूड अभिनेत्री सोभिता धुलिपालाला डेट करू लागला. नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. समांथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची ‘सिटाडेल: हनी बनी’ वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरीजमधल्या तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. लवकरच ती राही बर्वेच्या ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.