Ranji Trophy 2025 : २८ चौकारांसह द्विशतक, कर्नाटकचा रविचंद्रन बनला पंजाबच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ
Ranji Trophy 2025 Karnataka vs Punjab Match : रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात, अनेक मोठे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतले आहेत आणि काही अज्ञात खेळाडू देखील आहेत जे त्यांच्या शानदार खेळाने धमाल करीत आहेत. असाच एक खेळाडू म्हणजे स्मरन रविचंद्रन ज्याने कर्नाटकविरुद्ध द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली.
स्मरन रविचंद्रनने रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप सी मध्ये कर्नाटकसाठी खळबळ उडवून दिली. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात स्मृती रविचंद्रनने शानदार द्विशतक झळकावले. रविचंद्रनसमोर पंजाबच्या गोलंदाजांची अवस्था खूपच वाईट झाली. त्याने २७७ चेंडूंचा सामना केला आणि २०३ धावा केल्या ज्यामध्ये २५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. रविचंद्रनच्या या दमदार फलंदाजीमुळे कर्नाटक संघाने पंजाबविरुद्ध पहिल्या डावात ४७५ धावा केल्या.
रविचंद्रनच्या या दमदार फलंदाजीमुळे कर्नाटकला पंजाबविरुद्ध पहिल्या डावात ४२५ धावांची आघाडी मिळाली, ज्यामुळे त्यांचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. त्याआधी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ ५५ धावांवर गारद झाला. पहिल्या डावात पंजाबचे फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा ओलांडण्यात यशस्वी झाले.
पंजाबची दुसऱ्या डावात खराब सुरुवात
पहिल्या डावात फक्त ५५ धावांवर मर्यादित राहिलेल्या पंजाबची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटकच्या गोलंदाजांनी फक्त २४ धावांत दोन विकेट घेतल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल ७ धावा काढून संघाकडून खेळत आहे आणि जसिंदर सिंग १ धाव काढून खेळत आहे. प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग हे फलंदाज बाद झाले.
शुभमन गिल फ्लॉप पहिल्या इनिंगमध्ये
पंजाबकडून बऱ्याच काळानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणारा शुभमन गिल पहिल्या डावात मोठा फ्लॉप ठरला. पंजाबकडून शुभमन गिलला पहिल्या डावात फक्त ४ धावा करता आल्या. फक्त शुभमनच नाही तर संघातील सर्व फलंदाजांची अवस्था वाईट होती. दुसरीकडे, पहिल्या डावात कर्नाटककडून वासुकी कौशिकने ४ आणि अभिलाष शेट्टीने ३ बळी घेत पंजाबचे कंबरडे मोडले.