Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! अंतिम मुदत वाढवण्यात आली; लाखांच्या भरात प्रवेश

पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अंतिम मुदत ४ सप्टेंबरपर्यंत वाढवली. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि उद्योगसंबंधित कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांचा वाढता कल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 13, 2025 | 05:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असून, हा आकडा मागील दहा वर्षांतील सर्वोच्च ठरला आहे. प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्के झाली असून, वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाची अंतिम मुदत १४ ऑगस्टवरून ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली

मंत्री पाटील यांनी सांगितले की, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विविध उपक्रमांमुळे आणि प्रवेश वाढीसाठी घेतलेल्या विशेष उपाययोजनांमुळे पॉलिटेक्निक प्रवेशात मागील दहा वर्षांतील विक्रम झाला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार १४ ऑगस्ट हा अंतिम दिनांक ठरविण्यात आला होता; मात्र दहावी पुरवणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि सणासुदीच्या सुट्ट्यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत थेट संस्थांमध्ये जाऊन रिक्त जागांवर प्रवेश घेऊ शकतील.

हीच अंतिम तारीख थेट द्वितीय वर्ष प्रवेश तसेच बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी देखील लागू असेल. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स यांसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार, आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे. उद्योगसंबंधित कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर व्यावसायिक यशासाठीही सज्ज करतात, असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले. या विक्रमी प्रवेशामुळे राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात नवा उत्साह आणि उर्जा निर्माण झाली असून, तंत्रशिक्षण विभाग यापुढेही उद्योग-शिक्षण एकत्रीकरणावर भर देणार आहे.

Web Title: Record in polytechnic admissions deadline extended admissions worth lakhs polytechnic admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार
1

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार

SSC CHSL Admit Card 2025 Link: एसएससी सीएचएसएल अ‍ॅडमिट कार्ड निर्गमित, असे करा डाऊनलोड; परीक्षा 12 नोव्हेंबरपासून
2

SSC CHSL Admit Card 2025 Link: एसएससी सीएचएसएल अ‍ॅडमिट कार्ड निर्गमित, असे करा डाऊनलोड; परीक्षा 12 नोव्हेंबरपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.