शिक्षण विभागातील 45 फाईल्स गायब (File Photo : Files)
नागपूर : शिक्षण विभागातील रोज नवनवीन घोळ समोर येत आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा चर्चेत असताना असाच प्रकार उच्च माध्यमिकमध्ये झाल्याची चर्चा आहे. ११ वी व १२ वीच्या शिक्षकांच्या मान्यतेशी संबंधित ४५ वर फाईल्स गायब असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विभागात मोठी खळबळ उडाली असून बोगस शिक्षकांशी संबंधित या फाईल्स असल्याची चर्चा होत आहे.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष पथक गठीत करण्यात आले. पुण्याचे विभागीय आयुक्त या एसआयटीचे प्रमुख असून ते १ ते १२ पर्यंतच्या शिक्षकांच्या मान्यतेसोबत आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. त्याच विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली करण्यात आलेल्या शिक्षकांची तपासणी करण्यात आहेत.
हेदेखील वाचा : कबुतरखान्याच्या वादाला धार्मिक वळण; जैन समाजाच्या विरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक
अकरावी, बारावीच्या शिक्षकांच्या नियमबाह्य मान्यता देऊन शालार्थ आयडी मंजूर केल्याप्रकरणात चिंतामण वंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता एसआयटी याची चौकशी करणार असल्याने उपसंचालक कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे. अकरावी, बारावीमधील शिक्षकांची संबंधित ४५ ते ५० फाईल्स दिसत नसल्याची चर्चा विभागात आहे.
संबंधित टेबल प्रमुख चर्चेत
या सर्व फाईल्स अकरावी, बारावीच्या शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ आयडीशी संबंधित असल्याची चर्चा आहे. याचा शोध घेण्यात येत आहे. या सर्व फाईल्स असल्याने संबंधित टेबल प्रमुख चांगलेच चर्चेत आहे. प्राथमिक विभागाशी संबंधित ६३२ शिक्षकांचा फाईल्स गायब आहे. तसाच काहीसा हा प्रकार असल्याची बोलल्या जात आहे. यापूर्वी चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणाशीही संबंधित टेबल प्रमुखाचा संबंध असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे या प्रकरणी तो अडचणी येणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत उपसंचालक माधुरी सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेदेखील वाचा : Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट