Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय मेडिकलमधील पदे ‘निर्धारित’ वेळेत भरा; हायकोर्टाचे एमपीएससी व शासनाला आदेश

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गातील रिक्त पदे 'निर्धारित' वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या 'टीसीएसआयओएम' या खासगी एजन्सी, जिल्हा प्रशासन आणि शासनास सोमवारी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2024 | 03:01 PM
शासकीय मेडिकलमधील पदे ‘निर्धारित’ वेळेत भरा; हायकोर्टाचे एमपीएससी व शासनाला आदेश
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गातील रिक्त पदे ‘निर्धारित’ वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या ‘टीसीएसआयओएम’ या खासगी एजन्सी, जिल्हा प्रशासन आणि शासनास सोमवारी दिले. इतकेच नव्हे तर खंडपीठाने विविध पदांसाठीची स्पर्धा परीक्षा घेऊन निकाल घोषित करण्यासाठी प्रमाणपत्रांची पडताळणी करून नियुक्तीपत्र देण्याबाबतचे वेळापत्रकही ठरवून दिले.

खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. पदोन्नतीने भरावयाच्या प्राध्यापकांच्या ४१ रिक्त पदांपैकी शिफारशी प्राप्त झालेली ३३ पदे ६० दिवसांत आणि उर्वरित ८ पदे ९० दिवसांत भरा. सरळसेवेने भरावयाची प्राध्यापकांची ७१ पदे, सहयोगी प्राध्यापकांची १४० पदे १८० दिवसांत आणि सहायक प्राध्यापकांची ७६५ पदे २४० दिवसांत भरा. वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गाची ४२९ पदे १२० दिवसांत भरा. औषधनिर्माता गट ब संवर्गाची १२ पदे ६० दिवसांत भरा.

…अन्यथा कारवाई

उच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने डॉ. आशिष भिवापूरकर यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीचा अंतिम अहवाल १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करावा, अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने संबंधित चौकशी अधिकारी आणि सचिव सुमंत भांगे यांना दिले आहेत.

Web Title: Recruit the posts in govt medical in a fixed time mumbai high court order to mpsc and govt nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sambhaji nagar

संबंधित बातम्या

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर
1

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर

पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?
2

पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?

Pune Election : भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता
3

Pune Election : भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक
4

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.