सांगली : सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या पक्षात नेहमी होते. त्यामुळे काही अडचण नाही. शेवटी पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केलं पाहिजे हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे. असे सुचक वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रोहित आर आर पाटील यांचे नाव न घेता केले. ते आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची चर्चा राज्यभर झाली होती. कारण माजी गृहमंत्री आर आर पाटील ( Rohit patil ) यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी एकट्याने नगपंचायत लढली. कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला १० तर शेतकरी विकास आघाडीला ६, अपक्ष १, भाजपला ० जागा मिळाल्या आहेत. रोहित पाटील ( Rohit patil ) यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला आज जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.
काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता
तसेच गोव्यामध्ये काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी त्याठिकाणी एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता. पण शिवसेना राष्ट्रवादी त्याठिकाणी एकत्रित आहे. त्यांना मोठे यश मिळेल. असा विश्वासच त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हि बाळासाहेब ठाकरेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.