रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते , माजी जिल्हाप्रमुख, माजी संपर्कप्रमुख किशोर जैन आपल्या हजारो समर्थक , कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल झाले. यावेळी खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती. अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनिल तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केला असल्याचे किशोर जैन यांनी यावेळी बोलताना सांगितले.