
Ahilyanagar News : महापालिका निवडणुकीत आज अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध आले. दरम्यान आज पहिल्या दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४७७ अर्ज शिल्लक आहेत. उद्या माघारचा अखेरचा दिवस आहे. प्रभाग आठ ड मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे यांच्या विरोधात एकही अर्ज शिल्लक न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. असाच प्रकार प्रभाग १४ अ मध्ये झाला. तेथे देखील राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे बिनविरोध निवडून आले. उमेदवारी अर्ज प्रक्रियेतच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतली. आज या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ४७७उमेदवार राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यास उद्या शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. अपक्ष आणि बंडखोरांचे अर्ज मागे निघावेत यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. आज रात्री उशिरापर्यंत त्यांची मनधरणी केली जात होती. त्यामुळे उद्या किती अर्ज मागे निघतात, आणखी कोणी बिनविरोध निघते का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
मनपा निवडणुकीतील मनसेचे उमेदवारांचा दोन उमेदवार गायब असून २४ तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी सांगितले.
केडगाव भागात हा प्रकार घडला.
प्रभाग क्र. ३ (क) –
बोरकर शोभा सुधाकर.
प्रभाग क्र. ५ (ब) –
दिवटे आनंद हरिभाऊ,
इंगळे विकी संजय.
प्रभाग क्र. ७ (अ)-
माने प्रिया विकास,
माने विलास राधाजी.
प्रभाग क्र.७ (ड)-
बोरुडे अर्जुनराव भाऊराव,
भुतकर हनुमत शकर,
प्रभाग क्र. ८ (क) –
कातोरे राहुल लक्ष्मण,
नागरगोजे बाबासाहेब,
शहाबाई
बड़े आनंद अशोक,
प्रभाग क्र. ८ (ड) –
कोलते पोपट मुरलीधर.
प्रभाग क्र. १० (अ) –
छिंदम स्नेहा श्रीपाद.
प्रभाग क. १० (ड) –
मुर्तडकर स्वाती सागर,
अंचाडे ऋदेश भाऊसाहेब.
प्रभाग क्र. १३ (अ)-
कानडे स्वाती मिलिंद,
BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
प्रभाग क्र. १४ (अ)-
गाडळकर मळू लक्ष्मण,
ऋषिकेश विजय रासकर,
फुलसौंदर भगवान,
अवधूत
भांबरे हरिश शरद.
प्रभाग क्र. १५ (अ) –
गव्हाळे नम्रता गौरव,
प्रभाग क्र. १५ (क) –
खैरे साक्षी युवराज,
प्रभाग क्र. १५ (ह) –
पोळ गणेश केरबा,
शिंदे शिला अनिल.
प्रभाग क्र. १६ (क) –
कराळे हर्षद अशोक,
प्रभाग क्र. १६ (ड) –
काकडे सुजित बाबुराव.
प्रभाग क्र. १७ (क) –
कोतकर प्रतिभा ज्ञानेश्वर,
पुनम सोन्याबापू धैबुङ.