Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहितच असणार श्रीलंका दौऱ्यासाठी वन-डेचा कर्णधार; गौतम गंभीरचे म्हणणे ऐकत दिली खेळण्याची ग्वाही

IND vs SL ODI Series : रोहित शर्माच श्रीलंकेविरुद्धच्या ODI मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. रोहितने नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे म्हणणे ऐकत श्रीलंका दौऱ्यासाठी खेळणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय संघात रोहित शर्माच वन-डेचा कर्णधार असणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 18, 2024 | 08:35 PM
Rohit Sharma

Rohit Sharma

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Captain For Sri Lanka ODI Series : सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काय चालले आहे हे कोणालाही समजत नाही. टीम इंडियाला 27 जुलैपासून श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळायची आहे. मात्र या दौऱ्यासाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. भारताच्या पुढील टी-२० कर्णधाराबाबतही संदिग्धता आहे. दरम्यान, रोहित शर्माने नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा सल्ला स्वीकारला असून तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार असेल अशी बातमी समोर आली आहे.

वन-डे मालिकेत रोहितच सांभाळणार टीम इंडियाची कमान

आता रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, रोहित शर्मा सलग सहा महिने क्रिकेट खेळल्यामुळे श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळणार असल्याचीही बातमी आली होती. श्रीलंकेतील वनडे मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुष्टी केली आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळणार आहे.

विराट आणि बुमराहने देखील बीसीसीआयला कळवलेय

विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबतही अपडेट आले आहे. रिपोर्टनुसार, हे दोन्ही स्टार खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत. रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे.
टीम इंडियाची आज घोषणा होऊ शकते.

टीम इंडियाची घोषणा
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि सचिव जय शाह यांच्यासह निवड बैठकीचा भाग असतील. वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. तर हार्दिक पांड्या फक्त टी-20 मालिका खेळणार आहे. त्याने वैयक्तिक कारण सांगून वनडे मालिकेतून विश्रांती मागितली आहे.

Web Title: Rohit sharma accepted gautam gambhir advice so rohit sharmas captain for sri lanka odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 08:35 PM

Topics:  

  • bcci
  • Captian Rohit Sharma
  • Hardik Pandya
  • ICC

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
1

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
2

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
3

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
4

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.