Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा; ‘आई तारी तिला कोण मारी’,‘मर्दिनी’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक

मराठी सिनेसृष्टीत आशयप्रधान आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे. अशाच प्रभावी कथानकासह आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘मर्दिनी’ हा नवा मराठी सिनेमा.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 02:57 PM
Shreyas Talpade News cinema

Shreyas Talpade News cinema

Follow Us
Follow Us:
  • मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा;
  • ‘आई तारी तिला कोण मारी’,
  • ‘मर्दिनी’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक,
Shreyas Talpade News Movie :  मराठी सिनेसृष्टीत आशयप्रधान आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे. अशाच प्रभावी कथानकासह आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘मर्दिनी’ हा नवा मराठी सिनेमा. चित्रपटाचं पोस्टर लॉन्च नुकतंच करण्यात आले असून, या निमित्ताने चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमधून समोर आलेली पहिली झलक आणि त्यावरील आशयपूर्ण कॅप्शनमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या सामर्थ्याची कथा मांडणारा हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

श्रेयस तळपदे प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित ‘मर्दिनी’ हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, आईच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी कथा असल्याचे समोर येत आहे. पोस्टरवरील “आई तारी तिला कोण मारी” म्हणजेच लेकरांसाठी आई ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही. हे कॅप्शन चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक देतं. आई ही फक्त प्रेम, माया आणि जपणुकीची प्रतिमा नसते, तर आपल्या लेकरांवर संकट आलं की ती कठोर आणि निर्भय रूप धारण करून त्यांचं रक्षण करण्यासाठी उभी राहते, ही भावना या कथानकातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे.

चित्रपटात एका आईचा संघर्ष, तिच्या कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य स्त्री कशी परिस्थितीशी दोन हात करते आणि वेळ आली तर ‘मर्दिनी’सारखं सामर्थ्यवान रूप धारण करते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे.

चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावीपणा मिळणार असून, बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेत भावनिक पैलू जोडणारी ठरणार आहे. कलाकारांची निवड आणि विषयाची ताकद यामुळे ‘मर्दिनी’बद्दलची उत्सुकता अधिक वाढत आहे.

Khatron Ke Khiladi 15: ‘डर का नया दौर’ लवकरच सुरू! शोमध्ये होणार ‘या’ सेलिब्रिटींची धडाकेबाज एंट्री, कोण ठरणार सुपरहिट?

 

अजय मयेकर दिग्दर्शित ‘मर्दिनी’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली हा चित्रपट साकारला जात आहे. सहनिर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक तसेच पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला भक्कम आधार दिला आहे.

पोस्टर लॉन्चच्या अनावरणातून ‘मर्दिनी’च्या प्रवासाची पहिली झलकमुळे या चित्रपटाबद्दलची चर्चा चित्रपटवर्तुळात रंगू लागली आहे. आईच्या प्रेम, संरक्षण आणि संघर्षाच्या भावनिक कथेला मध्यवर्ती ठेवणारा हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ ची सलग तीन दिवसात दमदार कमाई

 

Web Title: Shreyas talpades new movie aai tari tila kon maari first look at the poster of the movie mardini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • abhijeet khandkekar
  • Entertainment marathi
  • marathi cinema
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर
1

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
2

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.