Khatron Ke Khiladi 15: ‘डर का नया दौर’ लवकरच सुरू! शोमध्ये होणार 'या' सेलिब्रिटींची धडाकेबाज एंट्री, कोण ठरणार सुपरहिट?
लवकरच खतरों के खिलाडी १५ हा शो प्रदर्शित होणार आहे. या शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते कलाकार एंट्री घेणार आणि कोणत्या आव्हानांना तोंड देणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. “डर का नया दौर” टॅगलाईनसह खतरों के खिलाडी १५ लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. या सिझनमध्ये एकूण 12 सेलिब्रिटी सहभागी होणार आहे. या सेलिब्रिटींची नाव आता जाहीर करण्यात आली आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तयार करण्यात आलेल्या खतरों के खिलाडी च्या अकाऊंटवर सेलिब्रिटींचे व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक एंट्री करणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण
बिग बॉस सिझन 19 फेम गौरव खन्ना आता खतरों के खिलाडी १५ मध्ये सहभागी होणार आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफ आणि बिग बॉस सिझन 19 चा विजेता असलेला गौरव आता खतरों के खिलाडी १५ मध्ये विविध स्टंट्स करताना पाहायला मिळणार आहे. तिसरी ट्रॉफी लवरकच येणार, अशा कमेंट्ससह गौरवच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
बिग बॉस १९ मध्ये टॉप दोन स्पर्धकांपैकी एक असलेली फरहाना भट्ट आता खतरों के खिलाडी १५ मध्ये स्टंट्स करताना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस १९ मध्ये फरहाना भट्ट पहिली रनर अप ठरली होती.
सोशल मीडियावर आणि अनेकदा सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये दिसणारा ओरी आता रोहीत शेट्टी यांच्या खतरों के खिलाडी शोमध्ये सहभागी होणार आहे. सोशल मीडियावर ओरीची एक वेगळीच क्रेझ आहे.
स्टँड-अप कॉमेडियन हर्ष गुजरालची देखील ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हर्ष करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या शोमध्ये दिसला होता. आता तो खतरों के खिलाडीमध्ये इतर स्पर्धकांसह स्टंट करताना पाहायला मिळणार आहे.
टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनचे नाव देखील ‘खतरों के खिलाडी 15’ साठी निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी जस्मिन ‘खतरों के खिलाडी 9’ मध्ये देखील सहभागी झाली होती.
यापूर्वी खतरों के खिलाडीच्या 12 व्या सिझनमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री रुबिना दिलैक पुन्हा एकदा नव्या सिझनमध्ये एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.
दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेता करण वाही देखील ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये स्टंट करताना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तो खतरों के खिलाडी 8 मध्ये देखील सहभागी झाला होता.
या यादीमधील आठवे नाव अविनाश मिश्रा यांचे आहे. बिग बॉस १८ मधील सदस्य अविनाश आता खतरों के खिलाडी १५ मध्ये सहभागी होणार आहेत.
अभिनेता ऋत्विक धनजानी याची देखील ‘खतरों के खिलाडी 15’ साठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी तो खतरों के खिलाडी 8 मध्ये देखील सहभागी झाला होता.
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेत ‘परी’ची भूमिका साकारत असलेली शगुन शर्मा आता ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये स्टंट करताना पाहायला मिळणार आहे.
खतरों के खिलाडी 11 आणि बिग बॉस 13 मधून घराघरात लोकप्रिय झालेला विशाल आदित्य सिंग आता नव्या अंदाजात ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये दिसणार आहे.
अभिनेत्री अविका गौर हिची देखील ‘खतरों के खिलाडी 15’ साठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ती ‘खतरों के खिलाडी 9’ मध्ये सहभागी झाली होती.






