Names of government employees in Gharkul list! Types at Lohara, excitement among citizens
कासार खरवंडी: प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पाथर्डी तालुक्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत घरकुलाच्या लाभार्थ्यांना पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामधे वितरीत केली. ग्रामसेवक, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे व गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी लाभार्थ्यांची वेळोवेळी भेट घेऊन घराचे काम सुरु करण्यास सांगितलेले होते. तसेच ज्यांना घराचे बांधकाम करावयाचे नाही, त्यांनी शासनाचे पैसे तात्काळ परत करावेत अशी मागणी केली आहे. गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी नोटीसा पाठवत कारवाई करण्याचे कळविलेले आहे. तरीही तालुक्यातील २८९ लाभार्थ्यांनी अद्याप काहीच केलेले नाही.
पाथर्डी तालुक्यातील २८९ लाभार्थ्यांनी घरकुलाचा प्रथम हप्ता मिळूनही अनेक दिवसांपासून बांधकाम सुरुच केलेले नाही. ज्यांना घर बांधायचे असेल, त्यांनी घराचे बांधकाम त्वरित सुरु करावे, अन्यथा शासनाचे पैसे तात्काळ परत करावेत. जे लाभार्थी घराचे बांधकाम सुरु करणार नाहीत व पैसेही परत करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी दिली.