Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv : जिल्हा प्रशासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे पत्र; नागरिकांच्या आरोग्यावर संकटाची भीती

बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 04, 2026 | 06:30 PM
जिल्हा प्रशासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे पत्र; नागरिकांच्या आरोग्यावर संकटाची भीती (फोटो सौजन्य-Gemini)

जिल्हा प्रशासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे पत्र; नागरिकांच्या आरोग्यावर संकटाची भीती (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

धाराशिव : सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर तामलवाडी (ता. तुळजापूर) शिवारात कार्यरत असलेल्या बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचारण कडवकर यांनी लातूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना याबाबत सोमवारी २ फेब्रुवारी रोजी लेखी पत्र पाठविले आहे.

प्रदूषणाचा मुद्दा उघडकीस

२० जानेवारी रोजी दैनिक ‘नवराष्ट्र’ने बालाजी अमाईन्स कारखान्यातून होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाबाबत वृत्त प्रसिद्ध करून या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली होती. या वृत्तानंतर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. हवेत दुर्गंधी, रसायनयुक्त पाणी शेतात सोडले जात असल्याचा संशय, तसेच जमिनीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत.

Karjat News : “माणगावतर्फे वरेडीमध्ये कर्जत परिवर्तन आघाडी परिवर्तन घडवणार”, एकनाथ धुळेंचा विश्वास

नागरिकांच्या आरोग्यावर परिणामाचा धोका

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही परिणाम होण्याची भीती आहे. रासायनिक प्रदूषणामुळे त्वचारोग, श्वसनाचे विकार व अन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही जाणकारांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा परिसर जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होऊ शकतात. राष्ट्रीय महामार्गा लगतच हा रासायनिक कारखाना असल्याने या मार्गावरील प्रवाशांनाही याचा गंभीर धोका असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

राजकीय व सामाजिक दबाव वाढला

या प्रकरणात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. बालाजी अमाईन्स ही रासायनिक कंपनी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत असल्यास तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हा कारखाना लोकवस्तीपासून दूर अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रशासनाची भूमिका

या सर्व तक्रारींची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचारण कडवकर यांनी संबंधित प्रकरणात प्रचलित अधिनियम, नियम, शासन निर्णय, न्यायालयीन आदेश व शासन परिपत्रकांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

पुढे काय?

या तपासणी अहवालावरून कारखान्याने प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले आहेत की नाही, हे स्पष्ट होणार आहे. नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाई, उत्पादन बंदी किंवा स्थलांतरासारखे कठोर निर्णय घेण्यात येऊ शकतात. त्यामुळे बालाजी अमाईन्स प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासन यावर किती ठोस आणि पारदर्शक कारवाई करते, याकडे नागरिक बारकाईने पाहत आहेत.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे १२ तासांनंतरही बंद, कोंडी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नवा सल्ला

 

Web Title: Dharashiv news marathi district administration sends inspection letter to pollution control board fear of threat to citizens health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • pollution

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.