नागपूर (Nagpur). पांडे कुटुंबातील (Pande Family) सदस्यांनी आरोप सुरजच्या नातेवाईक महिलेचे अश्लील छायाचित्रे (Pornography) व्हायरल केल्यानेच सूरज रामभुज शाहू याने राज ऊर्फ मंगलू पांडे याची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पांडे कुटुंबातील सदस्य हे छायाचित्र परिसरातील नागरिकांना दाखवायचे.
काही दिवसांपूर्वीही पांडे कुटुंबातील सदस्यांनी एका दुकानातील ग्राहकांना हे छायाचित्र दाखविले. यावेळी सूरजही तेथेच होता. त्यामुळेच त्याने राजची हत्या करून पांडे कुटुंबाला धडा शिकवला, असे सूरज हा पोलिसांना सांगत आहे.
[read_also content=”सावधान! सुंदर मुलीचा प्रोफाइल असलेली फ्रेंड रिक्वेट आली? सावधान! तुम्हीही होऊ शकता ‘असल्या’ प्रसंगांचे शिकार https://www.navarashtra.com/latest-news/be-careful-a-friend-request-with-a-beautiful-girl-profile-be-careful-you-too-can-be-a-victim-of-this-being-nrat-141758.html”]
सूरजचे पांडे कुटुंबातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. दोघे लग्नही करणार होते. परंतु, याला पांडे कुटुंबीयांचा विरोध होता. नोव्हेंबरमध्ये सूरज हा अपघातात जखमी झाला. तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. यावेळी पांडे कुटुंबातील तरुणी त्याला भेटायला जायची. सूरजने तरुणीचा नाद सोडावा, यासाठी पांडे कुटुंबातील सदस्यांनी सूरजच्या महिला नातेवाइकाला बळजबरीने घरी आणले.
तिचे अश्लील छायाचित्र काढले. ते सूरजला दाखविले. तू तरुणीचा नाद सोडला नाही तर यापेक्षाही अधिक आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडीओ काढून व्हायरल करू, अशी धमकी पांडे कुटुंबातील सदस्यांनी त्याला दिली. तेव्हापासूनच त्याने पांडे कुटुंबीयांना धडा शिकवण्याचा कट आखला.
काही दिवसांपूर्वीही पांडे कुटुंबातील सदस्यांनी सूरजसमोरच परिसरात नागरिकांना हे छायाचित्र दाखविले. त्यामुळे सूरज प्रचंड संतापला. त्याने वेबसीरिज पाहून राजच्या हत्येचा कट आखला. क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गुरुवारी त्याला सोबत नेले व त्याची हत्या केली, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सूरजची सोमवारपर्यंत पोलिस कोठडी घेतली. सूरजने कोणकोणत्या मार्गाने राजला नेले, याचे प्रात्यक्षिक शनिवारी पोलिसांनी केले, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले.