Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Nano: टाटा नॅनो पुन्हा धावणार इलेक्ट्रिक अवतारात? आता थेट EV अवतारात होणार एन्ट्री!

एका काळी भारतीयांच्या घराघरांत पोहोचलेली आणि मध्यमवर्गीयांचे स्वप्न ठरलेली एक लोकप्रिय गाडी आता नव्या रुपात रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 14, 2026 | 07:00 AM
Tata Nano: टाटा नॅनो पुन्हा धावणार इलेक्ट्रिक अवतारात? आता थेट EV अवतारात होणार एन्ट्री!
Follow Us
Follow Us:
  • भारतीय बाजारात मोठी लोकप्रियता मिळवलेली टाटा नॅनो लवकरच नव्या ईव्ही अवतारात येण्याची शक्यता आहे.
  • दुचाकीवरून चारचाकीकडे अपग्रेड होणाऱ्या शहरी ग्राहकांसाठी ही अत्यंत परवडणारी आणि सोयीस्कर ‘सिटी कार’ ठरेल.
  • आधुनिक फीचर्स, उत्तम सुरक्षा आणि जास्त रेंजसह ही गाडी लहान ईव्ही सेगमेंटमध्ये मोठा बदल घडवू शकते.

भारतीय ऑटोमोबाईल विश्वात आपल्या वेगळ्या ओळखीने गाजलेली टाटा नॅनो शोरूम्समधून गायब झाली असली, तरी आजही अनेक भारतीयांच्या मनात या गाडीबद्दल एक वेगळे स्थान आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती लोकप्रियता पाहता, टाटा नॅनो पुन्हा एकदा इलेक्ट्रिक अवतारात सादर होण्याची शक्यता ऑटो विश्वात चर्चेत आली आहे. कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी मूळ नॅनोची संकल्पना आजच्या शहरांमधील वाहतुकीच्या गरजांसाठी तंतोतंत लागू पडते.

मूळ संकल्पना आणि काळाची गरज

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांना परवडणारी आणि सुरक्षित चारचाकी उपलब्ध करून देणे, हा मूळ नॅनोमागील मुख्य हेतू होता. मात्र, ‘जगातील सर्वात स्वस्त गाडी’ म्हणून झालेले तिचे मार्केटिंग ग्राहकांच्या पसंतीस उतरले नाही. परिणामी, तिच्या वैशिष्ट्यांपेक्षा तिच्या किमतीचीच जास्त चर्चा झाली.

परंतु, आता भारतीय बाजारपेठ पूर्णपणे बदलली आहे. आजच्या काळात टू-व्हीलरवरून फोर-व्हीलरकडे अपग्रेड होणाऱ्या शहरी ग्राहकांसाठी नॅनो ईव्ही एक उत्तम ‘सिटी कार’ ठरू शकते. टाटाच्या ताफ्यात Tiago EV आधीच उपलब्ध असली, तरी त्याहून लहान आणि अधिक परवडणाऱ्या ईव्हीसाठी बाजारात अजूनही मोठी जागा रिकामी आहे.

भारतीय ऑटो इंजिनअरिंगचा जगात डंका! टेस्ला आणि BYD ला मागे टाकत टाटा मोटर्स बनली जगातील सर्वाधिक कार्यक्षम EV उत्पादक कंपनी!

टाटा नॅनो ईव्हीचा जुना प्रयोग आणि भविष्यातील आव्हाने

विशेष म्हणजे, टाटा मोटर्सने यापूर्वी ईव्हीचा प्रयोग केला होता:

  • जयम निओ: टाटाने ‘जयम ऑटोमोटिव्ह्स’सोबत मिळून नॅनोचे ईव्ही मॉडेल तयार केले होते. यात १७ kWh ची बॅटरी आणि १३० किमीची रेंज देण्यात आली होती.
  • आधुनिक गरजा: आजच्या काळात नॅनो ईव्ही सादर करायची झाल्यास कंपनीला अधिक रेंज, आधुनिक केबिन आणि चांगली सेफ्टी  द्यावी लागेल.
  • किमतीचे गणित: टाटा टियागो ईव्ही आणि नॅनो ईव्ही यांच्या किमतीत व आकारात स्पष्ट फरक ठेवावा लागेल, जेणेकरून टियागोच्या विक्रीवर परिणाम होणार नाही.
Tata Nexon Camo: सणासुदीच्या काळात टाटाचा धमाका; नवीन नेक्सॉन कॅमो झाली लाँच!

‘एमजी कॉमेट‘ला टक्कर देण्याची संधी!

भारतीय बाजारात MG Comet EV सारख्या छोट्या आकाराच्या ईव्हीला मिळणारा प्रतिसाद पाहता, लहान शहरांमधील वापरासाठी ईव्हीचा ट्रेंड स्पष्ट दिसतो. टाटा मोटर्सला आता नॅनोला ‘सर्वात स्वस्त गाडी’ म्हणून विकण्याची गरज नाही. जर कंपनीने तिला एक आकर्षक, सुरक्षित आणि आधुनिक ‘शहरी इलेक्ट्रिक कार’ म्हणून लाँच केले, तर या ऐतिहासिक गाडीला भारतीय रस्त्यांवर दुसरे यशस्वी आयुष्य मिळू शकते.

Web Title: Tata nano ev electric avatar comeback news auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Tata

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
2

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
3

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
4

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.