Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता सत्यात उतरणार…! ‘या’ ठिकाणी सुरु होणार मार्केट

कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. या मार्केट यार्ड साठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला गेला आहे. त्यामुळे . त्यामुळे या भागातील आंबा, काजू, नारळ , सुपारी, कोकम, भात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा कोकणी मेवा, ताजे मासे यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 15, 2024 | 10:08 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली (भगवान लोके): कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे कोकणातील पहिल्या मार्केट यार्डचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. केंद्रीय माजी मंत्री खासदार नारायण राणे, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेवरून आणि आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या मार्केट यार्ड साठी ४ कोटी २४ लाख ६६ हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सिंधूरत्नचे सदस्य प्रमोद जठार यांनी फार मोठी मेहनत घेतली. मार्केट यार्डसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ५ इमारती, परिसराला संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते आणि भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यासाठी हा निधी मंजूर झालेला आहे.

हे देखील वाचा- माणगांव रेल्वे स्थानकाला नवा लूक! आज पार पडला लोकार्पण सोहळा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोकणातील पहिले सुसज्ज मार्केट यार्ड

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या सिंधू रत्न समृद्ध योजनेतून ४ कोटी २४ लाख ६६ हजार रुपयाची मंजुर झालेले पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांना दिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोकणातील पहिले सुसज्ज मार्केट यार्ड उभे राहणार आहे. त्यामुळे या भागातील आंबा, काजू, नारळ , सुपारी, कोकम, भात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा कोकणी मेवा, ताजे मासे, सुकी मासळी, अशा उत्पादनां बरोबरच वेगवेगळे लाकूड, खैर लाकुड व जंगली लाकूड यांची ने – आण करण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात येणाऱ्या पालेभाज्या किंवा जीवनावश्यक वस्तू यांची या ठिकाणी स्टोरेज करून ते जिल्हाभर डिस्ट्रीब्यूट करण्याचा सर्वाधिक महत्वाचा असा हा उपक्रम यशस्वीरित्या होत आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक कृषी उत्पन्न बाजार समितीने जमीन खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी इमारती उभ्या राहणे गरजेचे होते आणि ते काम या निमित्ताने पूर्णत्वास जाणार आहे.

Web Title: The first market yard in konkan will start in nandgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 10:08 PM

Topics:  

  • Kankavli
  • Kokan News
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क
1

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 
3

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला
4

Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.