मुंबई : पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay aut) भेटण्यास आलेल्या राजकीय नेत्यांना तुरुंग प्रशासनाने मज्जाव केल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत हे सध्या अर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या एक खासदार आणि दोन आमदारांना त्यांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती आर्थर रोड जेल प्रशासनाने दिली
[read_also content=”गोंदियात पावसाचा कहर, जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळेला सुट्टी जाहीर https://www.navarashtra.com/maharashtra/rains-in-gondia-district-collector-declares-school-holiday-nrps-314408.html”]
शिवसेना नेते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा मुक्काम आता येत्या 22 ऑगस्टपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये असणारा आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयिन कोठडी सुनावली. आता त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या राजकीय व्यक्तींना देखील परवानगी नाकारण्यात आली आहे. दोन आमदार आणि एका खासदाराला ही परवानगी नाकारण्यात आली.
या दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात मागणी केली होती की राऊतांना ईडीच्या कोठडीत ज्या काही परवानग्या दिल्या होत्या त्या तुरुंगातही देण्यात याव्यात. त्यांना घरचे जेवण आणि औषध द्यावे. त्याचवेळी राऊत यांचा हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना तुरुंगाच्या कोठडीत घरचे जेवण देण्यात यावे आणि त्यांची औषधेही तुरुंगातच देण्यात यावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
[read_also content=”समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला १५ ऑगस्टची मुहूर्त https://www.navarashtra.com/maharashtra/the-first-phase-of-samriddhi-highway-is-scheduled-for-august-15-314449.html”]