Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरण महागात! अधीक्षक डॉ. तावरेंची तडकाफडकी उचलबांगडी

ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याप्रकरणात वैद्यकीय अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली

  • By प्रीति माने
Updated On: Apr 21, 2024 | 07:50 PM
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरण महागात! अधीक्षक डॉ. तावरेंची तडकाफडकी उचलबांगडी
Follow Us
Follow Us:

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी अखेर कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली असून, तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

सागर दिलीप रेणुसे (वय वर्षे ३०) या रुग्णाला १ एप्रिल रोजी अतिदक्षता विभागात उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्याच रात्री रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात २ एप्रिलला करण्यात आले. त्यात मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सादर केला होता.

डॉ. म्हैसेकर यांनी या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी कारवाईचे पाऊल उचलले. या प्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तत्काळ पदावरून हटविण्यात आले आहे. याचबरोबर तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना यावर उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही राज्य सरकारकडे करण्य़ात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, ससून रुग्णालयात रुग्णाला उंदीर चावल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पदावरून हटविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून, नवीन अधीक्षक नेमण्याचे आदेश रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: The medical superintendent was arrested in the case of rat bite to patient in icu of the sassoon general hospital nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 07:50 PM

Topics:  

  • daily news
  • pune news
  • pune news update
  • Pune Sassoon Hospital

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
1

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
2

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
3

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
4

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.