
सातारा – प्रतापगडाच्या (Pratapgarh) पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील (Afzal Khan Tomb) अतिक्रमण (Illegal Construction) काढले आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी केली होती. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावले. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. याबाबत शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी माहिती दिली.
शंभुराज देसाई म्हणाले की, प्रतापगडच्या पायथ्याशी जी कबर आहे त्याच्या मूळ ढाच्याला हात लावला नाही. त्याच्या शेजारी असणारी जागा, भिंतीचे बांधकाम, छत यांना हात लावलेला नाही. परिसरामध्ये असणारे वाढवलेले बांधकाम आणि वाढवलेली जागा हे अनधिकृत आहे, हे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मान्य केले. सुप्रीम कोर्टाकडून अतिरीक्त बांधकाम हटवण्याचे आदेश सरकारला दिले. त्यामुळे कोर्टाचे म्हणणे ऐकणे प्रशासनाचे काम आहे आणि ते कम पूर्ण करत आहेत, असेही देसाई म्हणाले.
अनेक दिवसांपासून हे काम सुरू होते. आज त्याला अंतिम स्वरूप आले आहे. नियमित कामकाजाचा भाग आहे आजच औचित्य साधत हे काम होत आहे असे नाही; हे बऱ्याच दिवसांपासून काम चालू आहे, असेही त्यांनी सांगितले. जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे. ते काढले पाहिजे आपण रस्त्याचे रुंदीकरण करताना अतिक्रमण हटवतो, तसेच हे काम आहे असेही त्यांनी सांगितले.